घरक्रीडाvijay hazare trophy : ऑलराउंर पांड्याला आणखी एक झटका; दुखापतीच्या कारणास्तव विजय...

vijay hazare trophy : ऑलराउंर पांड्याला आणखी एक झटका; दुखापतीच्या कारणास्तव विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून माघार

Subscribe

भारतीय संघातून खूप वेळ बाहेर असलेल्या हार्दिक पांड्याला आणखी एक झटका बसला आहे

भारतीय संघातून खूप वेळ बाहेर असलेल्या हार्दिक पांड्याला आणखी एक झटका बसला आहे. पांड्याने बुधवार पासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीच्या हंगामात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. कारण तो गोलंदाजीच्या बाबतीत अद्याप फिट झाला नाही आणि त्यासाठी तो त्यावर काम देखील करत आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या एका सिनीयर अधिकाऱ्याने सांगितले की, “बीसीएने (BCA) विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेबाबत विचारणा करण्यासाठी हार्दिकला ईमेल पाठवला होता. मागील तीन वर्ष तो बडोदाच्या संघाकडून क्वचितच खेळला आहे. मात्र त्याने एका वाक्यात उत्तर दिले आहे की तो सध्या मुंबईत दुखापतीवर काम करत आहे”.

हार्दिकच्या दुखापतीवरून अधिकाऱ्याला विचारले असता त्याने म्हंटले, “बीसीएला देखील याबाबत कल्पना नाही. आमच्या माहितीनुसार तो त्याच्या कंबरेच्या दुखापतीवर काम करत आहे. २०१९ च्या सर्जरी पासून तो चांगल्या स्थितीत दिसत नाही”. हार्दिकचा मोठा भाऊ क्रुणाल पांड्या राज्य मंडळाच्या निर्देशानुसार बडोदा अधिवेशनाच्या एक आठवडा आधी हजारे कॅम्पमध्ये सामील झाला होता. कारण संघाचा हिस्सा होण्यासाठी अधिवेशनात भाग घेणे अनिवार्य होते. असे अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, बडोदा क्रिकेट असोसिएशनने कृणालला सांगितले की, तो फक्त स्पर्धेदरम्यान संघाचा हिस्सा बनू शकत नाही सोबतच त्याला संघाच्या शिबिराचा देखील हिस्सा बनायले हवे. त्यानंतर कृणालने येऊन बीसीएच्या संघासोबत एक आठवडा सराव केला.


हे ही वाचा : http://harbhajan singh : हरभजन सिंग लवकरच घेऊ शकतो संन्यास; IPL 2022 च्या खेळाडूंची बोली लावताना दिसणार भज्जी?

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -