घरटेक-वेकAmazon Fab Phones Fest: OnePlus 6T, iPhone X वर मिळणार मोठी सूट

Amazon Fab Phones Fest: OnePlus 6T, iPhone X वर मिळणार मोठी सूट

Subscribe

सेलमध्ये एक्सचेंज ऑफरचाही ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. एवढेच नाही तर या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय सुविधेचाही लाभ घेता येईल.

ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचा आजपासून (११ एप्रिल ते १३ एप्रिल) फॅब फोन फेस्ट सेल सुरू होणार आहे. ज्यात iPhone X, One Plus 6T या कंपन्यांचे ब्रँडेड स्मार्टफोन अतिशय स्वस्तात खरेदी करता येतील. याशिवाय या सेलमध्ये एक्सचेंज ऑफरचाही ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. एवढेच नाही तर या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय सुविधेचाही लाभ घेता येईल. यामुळे आपला आवडता स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना घरबसल्या उपलब्ध होणार आहे.

One Plus 6T

या फेस्ट सेलमध्ये One Plus 6T वर आता पर्यंत सर्वांत जास्त सवलत मिळणार असून हा स्मार्ट फोन ३७ हजार ९९९ रूपयांत लॉंच केला होता. त्याच फोनच्या 8GB रॅम मॉडेलची किंमत ४५ हजार ९९९ रूपये आहे.

- Advertisement -

Apple iPhoen X

Apple iPhoen X च्या चांगल्या वेरिएंटची ९१ हजार ९०० रूपये असणाऱ्या या स्मार्टफोनवर देखील सूट मिळणार आहे. या सेल मधून स्मार्टफोन खरेदी करताना कंपनी कडून नो कॉस्ट ईएमआय देणार आहे. यात एचडीएफसी, बजाज फिनसर्व ईएमआई कार्ड आणि अॅमेजॉनवर ईएमआयच्या माध्यमातून सवलत मिळवता येईल.

- Advertisement -

Realme U1

Realme U1 चा वेरिएंट ज्यात 3GB रॅम आणि 32GB ची इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत ९ हजार ९९९ रूपयाचा असून अॅमेजॉन फॅब फोन फेस्टच्या दरम्यान या फोनवर सूट मिळणार आहे. यासोबतच, Vivo Y83 Pro वर ही ग्राहकांना सूट मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -