घरटेक-वेकतुम्ही अँड्रॉईड फोन वापरताय? मग ही Apps आजच डिलीट करा, नाहीतर

तुम्ही अँड्रॉईड फोन वापरताय? मग ही Apps आजच डिलीट करा, नाहीतर

Subscribe

अँड्रॉईड स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. तंत्रज्ञानाची जशी प्रगती होतेय, तसे त्याचे काही दुष्परिणामही आहेत. तुम्ही मोबाईलमध्ये वापरत असलेले Apps व्हायरसच्या माध्यमातून मोबाईलमधील डेटा चोरी करण्याचा प्रयत्न करत असतात. कंप्यूटर आणि लॅपटॉपसाठी अँटी व्हायरस तयार करणाऱ्या Avast या कंपनीने अँड्रॉईड फोन वापरकर्त्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. काही Apps ना तुमच्या मोबाईलमधून तात्काळ डिलीट करण्याचा इशारा Avast ने दिला आहे. एकूण २१ धोकादायक Apps ची यादी Avast ने प्रसिद्ध केली आहे. हे App सध्या प्ले स्टोअरमध्ये आहेतच, पण तुमच्या मोबाईलमध्ये देखील यापैकी कोणते Apps आहे का? आजच तपासा.

Avast ने सांगितल्याप्रमाणे हे २१ Apps पझल, कार आणि हॅलिकॉप्टर गेमिंगशी संबंधित आहे. अनेक युजर्सने या Apps बद्दल तक्रार केलेली आहे. या Apps वर भलत्याच आणि वेड्यावाकड्या जाहीराती दाखविण्यात येतात. या जाहीराती फोन हँग करण्याची समस्या निर्माण करत आहेत. ८० लाखाहून अधिक लोकांनी ही Apps डाऊनलोड केले असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

धोकादायक Apps ची यादी खालीलप्रमाणे –

1. Shoot Them
2. Crush Car
3. Rolling Scroll
4. Helicopter Attack – NEW
5. Assassin Legend – 2020 NEW
6. Helicopter Shoot
7. Rugby Pass
8. Flying Skateboard
9. Iron it
10. Shooting Run
11. Plant Monster
12. Find Hidden
13. Find 5 Differences – 2020 NEW
14. Rotate Shape
15. Jump Jump
16. Find the Differences – Puzzle Game
17. Sway Man
18. Desert Against
19. Money Destroyer
20. Cream Trip
21. Rolling Scroll

एवास्टच्या सायबर सिक्युरिटी एक्सपर्टने नुकतीच गुगल प्ले स्टोअरवरील उपलब्ध Apps चा आढावा घेतला. तेव्हा त्यांना ही धोकादायक Apps आढळून आले. त्यानंतर Avast ने या धोकादायक Apps ची यादी सार्वजनिक केली आहे.

- Advertisement -

नुकतेच अँड्रॉईडवर एका व्हायरसने हल्ला केला होता. हा व्हायरस युझर्सचा डेटा हॅक करुन त्याचा दुरुपयोग करण्याची धमकी मोबाईल युझर्सला द्यायचा. डेटाच्या बदल्यात युझरकडून खंडणी वसूल केली जायची. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करत असताना जरा सांभाळून राहण्याची गरज आहे. तुम्हाला रोजच्या वापरता जे आवश्यक Apps आहेत, तेच इन्स्टॉल करावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -