घरटेक-वेकiPhone घेण्याची इच्छा आहे; आता येतोय स्वस्तातला आयफोन

iPhone घेण्याची इच्छा आहे; आता येतोय स्वस्तातला आयफोन

Subscribe

स्वस्त आयफोनची चर्चा महिनाभर चालू आहे. मात्र हा स्वस्त आयफोन मार्चमध्ये लाँच केला जाणार आहे.

अनेकांना एकदातरी आयफोन वापरण्याची इच्छा असते. मात्र आयफोनच्या किंमतीमुळे अनेकजण हा फोन घेणे टाळतात. पण आता पुढील महिन्यात मार्चमध्ये स्वस्त आयफोनची प्रतिक्षा संपुष्टात येऊ शकते. आयफोनची निर्माती Apple कंपनी येत्या ३१ मार्चला iPhone SE 2 लाँच करण्याच्या तयारीत आहे. Apple ने यापूर्वी iPhone SE हा फोन इतर आयफोन्सच्या तुलनेने कमी किंमतीमध्ये लाँच केला होता. त्यानंतर SE मालिकेचे फोन बाजारात आणणे बंद केले. आता पुन्हा एकदा iPhone SE 2 बाजारात आणण्याची तयारी Apple ने केली आहे. मात्र, टेक एक्सपर्टच्या मतानुसार iPhone SE 2 नाही तर iPhone 9 हा बाजारात आणणार असल्याचे म्हटले आहे. कारण iPhone 8 नंतर iPhone X बाजारात आणला होता.

Apple चा स्वस्त फोन ३१ मार्चला लाँच केला जाणार असून ३ एप्रिलपासून याच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. या फोनची किंमत ३९९ डॉलर म्हणजेच भारतीय चलनात त्याची किंमत २५,५२५ रुपये एवढी असणार आहे.

- Advertisement -

iPhone SE 2 या फोनमध्ये A13 प्रोसेसर असणार आहे. आयफोन ११ सीरीजमध्ये ए १३ बायोनिक प्रोसेसर देण्यात आला होता. यासह ३ जीबी रॅम सोबत ६४ आणि १२८ जीबी स्टोरेज मध्ये फोन उपलब्ध असणार आहे. आयफोन ८ प्रमाणे या नव्या आयफोनची डिझाइन असण्याची शक्यता आहे. या नव्या आयफोनमध्ये ४.७ इंची डिस्प्ले असू शकतो. या स्मार्टफोनद्वारे ऍपल कंपनी टच आयडी फिचर पुन्हा एकदा आणू शकते. ‘आयफोन ११’ सीरीजमध्ये देण्यात आलेला, ए१३ बायोनिक प्रोसेसर या फोनमध्येही देण्यात येऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -