घरटेक-वेकJio, Vi, BSNL चे ८४ दिवसांच्या वॅलिडिटीचे बेस्ट प्रीपेड प्लॅन, अनलिमिटेड डेटासह...

Jio, Vi, BSNL चे ८४ दिवसांच्या वॅलिडिटीचे बेस्ट प्रीपेड प्लॅन, अनलिमिटेड डेटासह अनेक फायदे

Subscribe

लॉकडाऊनदरम्यान अनेक लोक इंटनेटचा सर्वाधिक वापर करत आहेत. त्यामुळे अनेक सिमकार्ड कंपन्याही आता  ग्राहकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी दररोज नवनवीन प्लॅन सुरु करत आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉल आणि डेटासह अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जातो. यातच Jio, Vi, Airtel, BSNL यांसारख्या कंपन्यांनी कमी किंमतींत ८४ दिवसांच्या वॅलिडिटीसह अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी काही खास प्लॅन (पॅक) तयार केले आहेत. जाणून घेऊया, यातील काही बेस्ट प्लॅनबद्दल..

Vi चा ६९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vi च्या ६९९ रुपयांच्या प्रीपेड पॅकमध्ये डबल डेटासह ८४ दिवसांची वॅलिडिटी दिली जात आहे. या पॅकमध्ये युजर्सला 4GB डेली डेटाची ऑफर दिली जात आहे. तसेच Vi वर अनलिमिटेड आणि १०० मेसेजची सुविधा देण्यात आली आहे. या पॅकसह विकेंड डेटा रॉलओवर देखील दिले जात आहे.

- Advertisement -

Vi चा ५९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vi च्या ५९९ रुपयांच्या प्रीपेड पॅकमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची वॅलिडिटी दिली जात आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये रोज 1.5 GB डेटा मिळतो. यासह अनलिमिटेड कॉलिंगसह डेली १०० SMS फ्री पाठवण्याची सुविधा मिळते. या पॅकचा विकेंड डेटा रॉलऑवरसह देखील येत आहे. तसेच Vi Movies and TV चे एक्सेस सुद्धा या रिचार्ज पॅकमध्ये फ्री मिळते.

९९९ रुपयांत जिओ प्रीपेड पॅक

जिओचा ९९९ रुपयांचा प्रीपेड पॅकची वैधता ८४ दिवसांची आहे. विशेष म्हणजे या पॅकमध्ये दररोज एकूण ३ जीबी डेटा ऑफर केला जातो. ग्राहकांना वापरासाठी एकूण २५२ जीबी डेटा मिळतो. यासह अनलिमिटेड कॉलिंगसह दर दिवसा १०० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन या रिचार्ज पॅकमध्ये फ्री दिले जाते.

- Advertisement -

BSNL चा ५९९ रुपयांचा प्रीपेड पॅक

BSNL चा ५९९ रुपयांचा बेस्ट प्रीपेड पॅकमध्ये ८४ दिवसांच्या वैधतेसह दररोज 5 GB डेटा दिला जातो. रोज मिळणाऱ्या डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होवून 80 Kbps होते. ८४ दिवसांच्या या पॅकमध्ये ग्राहकांना एकूण 420GB डेटा मिळत आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -