घरटेक-वेकBSNLने लाँच केला 'अभिनंदन' प्लान

BSNLने लाँच केला ‘अभिनंदन’ प्लान

Subscribe

BSNL चा हा प्रीप्रेड प्लान १५१ रुपयांचा असून हा प्लान सर्वत्र उपलब्ध

‘भारत संचार निगम लिमिटेड’ने (BSNL) ने एक नवा प्रीपेड प्लान ‘अभिनंदन-१५१’ लाँच केला आहे. BSNL चा हा प्रीप्रेड प्लान १५१ रुपयांचा असून हा प्लान सर्वत्र उपलब्ध असून या प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल्स, १ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळणार आहेत. २४ दिवसांपर्यंत लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल मोफत देण्यात आले आहेत. २४ दिवसांनंतर १८० दिवसांसाठी इनकमिंग सुविधा मोफत देण्यात आली आहे.

९० दिवसांसाठी बाजारात उपलब्ध

या प्लानमध्ये १०० फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग आहे. रोमिंग कॉलचा फायदा मुंबई आणि दिल्ली सर्कलमध्ये होणार आहे. प्लानमध्ये मिळणारे फ्री बेनिफिट २४ दिवसांपर्यंत वैध असणार आहे. त्याशिवाय प्लानची वैधता १८० दिवस असणार आहे. बीएसएनएलचा हा प्लान ९० दिवसांसाठी बाजारात उपलब्ध असणार असून १० सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

- Advertisement -

BSNL चा ६६६ रूपयांचा प्लान

BSNLने आपल्या ६६६ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना १३४ दिवसांची कालावधी मिळणार आहे. या प्लानमध्ये ग्राहक रोज ३.७ जीबी डेटा मिळणार असून अनलिमिटेड कॉलिंग, फ्री रोमिंगचे देखील फायदे मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -