घरटेक-वेकअंबानींनी 5Gची घोषणा करताच स्मार्टफोन कंपन्यांमध्ये स्पर्धा; सॅमसंग A52 ची एंट्री?

अंबानींनी 5Gची घोषणा करताच स्मार्टफोन कंपन्यांमध्ये स्पर्धा; सॅमसंग A52 ची एंट्री?

Subscribe

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी २०२१ मध्ये भारतात Jio 5G लाँच करण्यात येईल अशी घोषणा केली. त्यानंतर स्मार्टफोन उत्पादकांमध्ये 5G स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. कमी किंमतीत 5G स्मार्टफोन बाजारात उपलब्ध करुन देण्यासाठी आता कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. अंबानींच्या 5G च्या घोषणेमुळे आता २० हजार रुपयांपर्यंतचे 5G स्मार्टफोन बाजारात येऊ लागतील. Moto G 5G या स्मार्टफोन चर्चेत आहे. दरम्यान, आता सॅमसंग देखील कमी किंमतीत 5G स्मार्टफोन बाजारात आणण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग Galaxy A52 5G बाजारात आणण्याची तयारी करत आहे. स्मार्टफोन २०२१ च्या सुरूवातीला लाँच केला जाऊ शकतो. गीकबेंचच्या वेबसाइटवरून Galaxy A52 5G च्या काही वैशिष्ट्यांचादेखील अंदाज वर्तविला जात होता. पण आता लोकप्रिय टिपस्टर स्टीव्ह हॅमरस्टॉर्फरने OnLeaks ट्विटर हँडलवरून काही छायाचित्रे शेअर केली आहेत. हे फोटो चे आहेत.

- Advertisement -

स्मार्टफोनच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, मागील रिअल पॅनेलवर चार रियर कॅमेर्‍याचे सेटअप असण्याची शक्यता आहे. फ्रंटमध्ये पंटहोल डिस्प्ले आहे, ज्यामध्ये कंपनी Infinity O डिस्प्ले वापरणार आहे. Galaxy A52 5G मध्ये पातळ बेझल असतील आणि USB Type C सह 3.5mm चे हेडफोन जॅक देण्यात येणार आहे. कॅमेरा मॉड्यूल Galaxy Note 20 सीरिजसारखे आहे.

अहवालानुसार Galaxy A52 5G मध्ये ६.५ इंचाचा Infinity O डिस्प्ले देण्यात येणार आहे. फोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात येईल. हा स्मार्टफोन Android 11 आधारित सॅमसंगच्या कस्टम मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार आहे. Galaxy A52 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 6GB रॅम दिला जाऊ शकतो. कंपनी हा स्मार्टफोन ३० हजार रुपयांत भारतात लाँच करेल. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -