घरमहाराष्ट्रमराठा आरक्षण सुनावणी : यंदा होमवर्क चांगला, भक्कमपणे बाजू मांडली जाईल -...

मराठा आरक्षण सुनावणी : यंदा होमवर्क चांगला, भक्कमपणे बाजू मांडली जाईल – खासदार संभाजीराजे

Subscribe

आज दुपारी सर्वोच्च न्यायालयात घटनापिठापुढे असणाऱ्या सुनावणीत वरिष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांच्या टीममार्फत चांगली बाजू मांडली जाईल असा मी विश्वास ठेवतोय. आजच्या सुनावणीत वकीलांची टीमने भक्कपणाने बाजू मांडावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आज दोन वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडली जाईल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मराठा आरक्षण प्रकरणात मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समिती जाहीर केली आहे.

वरिष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांच्यासह त्यांच्या टीमचे सहकारी मराठा समाजाची भूमिका आजच्या सुनावणीत मांडणार आहेत. मागच्या सुनावणीच्या वेळी ज्या चुका झाल्या, त्या चुका दुरूस्त केल्या असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. या संपुर्ण प्रकरणात माझाही पाठपुरावा सुरू आहे. मला मुख्यमंत्र्यांचा या संपुर्ण तयारीबाबत फोन आला होता. उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुकुल रोहतगी यांच्या टीमशी संवाद साधला आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीसाठी एक चांगला समन्वय साधतानाच दुरावा भरून काढलेला आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संपुर्ण टीमचा बऱ्यापैकी होमवर्क झाला आहे. पाच वकीलांच्या टीमने एकमेकांशी संवाद स्ट्रॅटेजी आखली आहे. तसेच आजच्या सुनावणीसाठी जो होमवर्क अपेक्षित होता तो केला आहे. यंदाच्या सुनावणीसाठी सर्वांचेच चांगले कोऑर्डिनेशन चांगल झाले आहे असे ते म्हणाले.

- Advertisement -

मराठा समाजातील १५ टक्के समाज सोडला तर उर्वरीत गरीब मराठा समाजावर अन्याय होत आहे. म्हणूनच घटनापीठाच्या न्यायाधीशांना विनंती आहे की त्यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा असेही यावेळी म्हणाले. आम्ही सामाजिक मागासचे आरक्षण मागतो आहे, ओबीसीकडून आरक्षण काढून घ्यायचा विषय नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे ओबीसी आरक्षण काढून घ्यायचा विषय नाही. मराठा आणि ओबीसी समाजाला विनंती आहे की कोणाच्याही आरक्षणावर गदा येणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विशेष एसईबीसीचे आरक्षण मिळावे यासाठीच हा लढा सुरू आहे, असेही ते म्हणाले.


 

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -