घरताज्या घडामोडीजम्मू काश्मीर: पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये एकाबाजूला पुलवामा जिल्ह्यातील टिकेन गावात सुरक्षा दलात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. तर दुसऱ्याबाजूला बारामुला जिल्ह्यातील सिंहपोरा गावातील मुख्य बाजारात दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा हल्ला केल्यामुळे तीन नागरिक जखमी झाले आहेत. माहितीनुसार दहशतवाद्यांना सुरक्षा दलावर ग्रेनेडचा हल्ला करायचा होता. पण ग्रेनेड निशाण्यावर न पडता नागरिकांच्यामध्ये फुटला. यामुळे तीन नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरक्षा दलाने स्थानिक लोकांची मदत घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच सुरक्षा दलात आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, आज सकाळी ग्रेनेडचा हल्ला झाला. सिंहपोरा गावाच्या मुख्य बाजारात एक सुरक्षा दल उभे होते, त्यावेळेस अचानक हल्ला झाला. दरम्यान हल्ला करणाऱ्यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे. या हल्लात तीन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना त्वरित पट्टन ट्रामा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ग्रेनेडचा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा तपास सुरू आहे.

- Advertisement -

तसेच माहितीच्या आधारे एसओजी, सेनाचे ५५ आरआर आणि सीआरपीएफची जवान पुलवामा जिल्ह्याच्या टिकेन भागात पोहोचले होते. त्यांना या भागात दोन ते तीन दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. या भागात पोहोचल्यानंतर सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यावेळेस दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाचे जवान जवळ येत असल्याचे पाहिले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. अचानक गोळीबार सुरू झाल्यामुळे सुरक्षा दलाने देखील चोख प्रत्युत्तर दिले. पण यावेळेस स्थानिक नागरिकमध्ये आल्यामुळे तो जखमी झाला आहे. त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना शरण जाण्याची संधी दिली होती. पण दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या ठार झालेल्या दहशवाद्यांची ओळख पटली असून या दोघांचेही अल-बदर मुजाहिदीन दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – सावधान! ७० लाख भारतीयांच्या डेबिट, क्रेडिट कार्डच्या माहितीसह ईमेल-आयडी लीक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -