Flipkart संक्रांत धमाका : फक्त 429 रुपयांत मोबाईल

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू खरेदी करण्यासाठी केवळ आज आणि उद्या (१४, १५ जानेवारी) असा दोन दिवसांचाच कालावधी आहे.

Hurry up! Buy Smartphones at Flipkart Sankranti Special offer

मकर संक्रांत आणि पोंगल सणाच्या निमित्ताने Flipkart या ई-कॉमर्स वेबसाईटने ग्राहकांसाठी काही भन्नाट ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या संक्रांत स्पेशल ‘सेल’ अंतर्गत मोबाईल फोन्स, स्मार्ट टीव्ही आणि अन्य बऱ्याच इलेक्ट्रॉनिक उपकरणावंर भरघोस सूट देण्यात आली आहे. या विशेष ‘फेस्टिव्ह सेल’मध्ये नव्या आणि जुन्या अशा अनेक वस्तूंवर किंवा उपकरणांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिला गेला आहे. १२ जानेवारी पासून सुरू झालेली ही ऑफर उद्या म्हणजेच १५ जानेवारीपर्यंतच सिमीत असणार आहे. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू खरेदी करण्यासाठी केवळ आज आणि उद्या (१४, १५ जानेवारी) असा दोन दिवसांचाच कालावधी आहे. दरम्यान, Flipkart च्या या बंपर सेलमध्ये नेमक्या कोणकोणत्या वस्तूंवर सूट आहे आणि नक्की किती रुपयांचं डिस्काउंट मिळणार आहे? यावर एक नजर टाकूया…

Flipkart Sankranti Special ऑफर

 

  • Flipkart च्या संक्रात विशेष ऑफर्समध्ये तुम्हाला फोन आणि टीव्हीवर ‘नो कॉस्ट EMI’ ची सुविधा देण्यात आली आहे.
  • याशिवाय कॅशबॅक, एक्स्चेंज ऑफर आणि ३,२०० रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूटही मिळू शकते
  • Axis बँकेच्या कार्ड धारकांना मोबईल आणि टी.व्ही. खरेदीवर ५ टक्के अधिक सूट मिळणार आहे
  • ऑफरमधील या सगळ्या प्रॉडक्ट्सवर १ वर्षाची वॉरंटी तर अॅक्सेसरीजवर ६ महिन्यांची वॉरंटी देण्यात आली आहे
  • याशिवाय काही निवडक फिचर फोन्सवरही ऑफर देण्यात आली आहे. या फोन्सची किंमत केवळ ४२९ रुपयांपासून सुरु आहे. या भन्नाट ऑफरमध्ये १० हून अधिक कंपन्यांचे १०० पेक्षा जास्त फिचर फोन सामाविष्ट आहेत


‘या’ स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काउंट

फ्लिपकार्टच्या संक्रात आणि पोंगल विशेष ऑफरमध्ये काही ठराविक कंपनींच्या विशीष्ट मॉडेल्सवरच डिस्काउंट मिळणार आहे. यामध्ये Nokia 5.1 Plus, Asus Zenfone Max Pro M2, Redmi Note 6 Pro, Redmi Note 5 Pro, Honor 9 Lite, Vivo V9 Lite, Vivo V9 Pro, Motorola One Power, iPhone 6S, Lenovo K9 आणि Samsung Galaxy On6 आदी स्मार्टफोन्सचा समावेश आहे. प्रत्येक कंपनीनुसार आणि त्या-त्या मॉडेलनुसार डिस्काउंटच्या किंमतीमध्ये फरक असणार आहे. फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक आपल्या पसंतीचा आणि बजेटमध्ये बसणारा फोन निवडून तो खरेदी करू शकतात. ही ऑफर उद्यापर्यंतच असल्यामुळे तुम्ही जर फोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर त्वरा करा.