घरटेक-वेकभारतात LG K42 मोबाईल क्वॉड कॅमेरा सेटअपसह लाँच; जाणून घ्या फीचर्स

भारतात LG K42 मोबाईल क्वॉड कॅमेरा सेटअपसह लाँच; जाणून घ्या फीचर्स

Subscribe

LG K42 क्वॉड रियर कॅमेरा सेटअपसह ४००० एमएएच क्षमतेच्या बॅटरी सोबत भारतात लाँच

LG इलेक्ट्रॉनिक्सने मेड इन इंडिया स्मार्टफोन LG K42 ला भारतात लाँच केले आहे. LG K42 हा स्मार्टफोन flipkart वर २६ जानेवारीपासून विक्रीस उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची किंमत १० हजार ९९० रूपये आहे. हा LG K42 ला भारतात क्वॉड रियर कॅमेरा सेटअपसह ४००० एमएएच क्षमतेच्या बॅटरी सोबत लाँच केले आहे. तसेच नवीन एलजी फोन मिलिट्री-ग्रेड MIL-STD-810G सर्टिफाइड बिल्ड सोबत येतो. या फोनमध्ये ९ वेगवेगळ्या कॅटेगरीत यूएस मिलिट्री टेस्टिंग पास केली आहे. यात हाय लो टेम्परेचर, शॉक, व्हायब्रेशन, टेम्परेचर शॉक आणि ह्यूमिडिटी याचा समावेश आहे.

भारतात लाँच कऱण्यात आलेल्या LG K42 ची किंमत ३ जीबी प्लस ६३ जीबी व्हेरियंटसाठी १० हजार ९९० रुपये आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन २६ जानेवारी पासून ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करताना ग्रे आणि ग्रीन कलरचा पर्याय राहणार आहे. यासह या फोनसोबत दोन वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी आणि एक वर्षासाठी फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट ग्राहकांना देण्यात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये दोन सीम वापरता येणार असून नॅनो सीम सपोर्ट देखील असणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० बेस्ड एलजी यूएक्सवर काम करतो.

असे आहेत LG K42 चे फीचर्स

  • या फोनमध्ये ६.६ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅमसोबत ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो पी २२ प्रोसेसर दिला आहे.
  • या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी रियरमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे.
  • या स्मार्ट फोनच्या फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी देण्यात आला आहे.
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -