भारतीय कंपनीने ट्रू वायरलेस इअरबड्स केले लाँच, जाणून घ्या किंमत

patron launches bassbuds urban tws earbuds
भारतीय कंपनीने ट्रू वायरलेस इअरबड्स केले लाँच, जाणून घ्या किंमत

स्वदेशी कंपनी Ptron ने नवीन ट्रू वायरलेस इअरबड्स Bassbuds Urban लाँच केले आहेत. या इअरबड्सची किंमत १ हजार २९९ रुपये इतकी आहे. Amzone प्राईम डे सेलवर ६ ऑगस्टपासून याची विक्री सुरू झाली आहे. Ptron Bassband Urban इअरबड्स तीन कलर व्हेरिएंटमध्ये आहेत. गार्नेट ब्लॅक, रोझ गोल्ड आणि मूनस्टोन व्हाइट या तीन कलरमध्ये हे इअरबड्स लाँच केले आहेत. या इअरबड्समध्ये ब्लूटूथ ५.० कनेक्टिव्हिटी दिली गेली आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, यामध्ये स्टिरियो साऊंडसाठी A2DP टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. खास म्हणजे या इअरबड्समध्ये इअर टिप देखील दिले गेले आहेत. जेणेकरून ते कानात नीट बसू शकतील. बॅकअपबद्दल बोलायचे तर कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे इअरबड्स एका चार्जवर ५ तासांपर्यंतीच बॅटरी बॅकअप दिली आहे. यासह 400mAh बॅटरी देखील दिली गेली आहे.

या इअरबड्समध्ये टच कंट्रोल देखील दिला गेला आहे. जेणेकरून कॉलिंग आणि म्युझिक कंट्रोल करता येईल. फूल चार्ज केल्यानंतर १५ तास हे इअरबड्स सुरू राहू शकतात. pTron चे सीईओ अमीन ख्वाजा या इअरबड्सच्या लाँचिंग दरम्यान म्हणाले की, ‘कंपनीचे व्हिजन स्टाईल आणि परफॉरमन्स दरम्यान क्रॉसओवर प्रोव्हाईड करणे आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘बेसबड्स अर्बनच्या माध्यमातून सुपीरियर ऑडिओ परफॉरमन्ससह स्टाईलिश डिझाईन डिलिव्हरी करायचे आहे.’ pTron चे इअरबड्समध्ये गुगल असिस्टेंटचा सपोर्ट दिला आहे. एवढेच नाही तर Amzone अलेक्सा वॉयस असिस्टेंटचा देखील सपोर्ट दिला गेला आहे.