घरटेक-वेकजबरदस्त बॅटरीवाला Realme C11 स्मार्टफोनचा आज सेल, जाणून घ्या किंमत

जबरदस्त बॅटरीवाला Realme C11 स्मार्टफोनचा आज सेल, जाणून घ्या किंमत

Subscribe

फ्लिपकार्टवर दुपारी १२ वाजल्यापासून रियलमी सी ११ या स्मार्टफोनचा सेल सुरू होणार आहे.

भारतात रियलमी सी ११ (Realme c11) स्मार्टफोनचा पुन्हा एकदा आज सेल असणार आहे. हा सेल ऑनलाईन शॉपिंग वेबासाईट फ्लिपकार्ट (Flipkart)वर दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे. हा रियलमीचे बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे. जो मागील महिन्यात लाँच केला होता. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी, रिव्हर्स चार्जिंग आणि ड्युअल रियर कॅमेरा फिचर्स मिळतील. अलीकडे कंपनीने याच सीरिजचे दोन नवीन फोन रियलमी सी १२ ( Realme C12) आणि रियलमी सी १५ ( Realme C15) लाँच केले आहेत.

रियलमी सी ११ ची किंमत

रियलमी सी ११ एकाच व्हेरिएंटमध्ये येतो. फोनच्या 2GB रॅम + 32GB इंटरनल स्टोरेजच्या मॉडेलची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. या फोनमध्ये दोन कलर ऑप्शन आहेत. एक रिच ग्रे आणि दुसरा रिच ग्रीन. या सेलअंतर्गत फ्लिपकार्टने अॅक्सेस बँक (Axis Bank)क्रेडिट कार्डवर ५ टक्के कॅशबॅक आणि अॅक्सेस बँक बज (Axis Bank Buzz) क्रेडिट कार्डवर ५ टक्के सूट दिली जाणार आहे. याशिवाय नो-कॉस्ट इएमआयचा ऑप्शन देखील मिळत आहे.

- Advertisement -

रियलमी सी ११ चे फिचर्स

या फोनमध्ये ६.५ इंचचा एचडी+ मिनी-ड्रॉप डिस्प्ले मिळेल. ज्याचे रिझोल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. यामध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर, 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज दिली गेली आहे. यामध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे. जे रिव्हर्स चार्जिंग फिचरसोबत येते. तसेच फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. रियर कॅमेरामध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसेर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर दिला गेला आहे. सेल्फीसाठी रियलमी सी ११ मध्ये ५ मेगालपिक्सल फ्रंट कॅमेरा मिळत आहे. कनेक्टिव्हीसाठी यामध्ये 4G, VoLTE, वायफाय 802.11 b/g/n, ब्लूटूथ v5.0, जीपीएस, माइक्रो-यूएसबी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला गेला आहे.

Realme C15 स्पेसिफिकेशन्स

परफॉर्मन्स – MediaTek Helio G35
डिस्प्ले – ६.५२ इंच (16.56 cm)
स्टोरेज – 64 GB
कॅमेरा – 13 MP + 5 MP + 2 MP + 2 MP
बॅटरी – 6000 mAh
किंमत – ११ हजार ९९९
रॅम – Realme C15, 3 GB

- Advertisement -

हेही वाचा – TikTok च्या खरेदीसाठी आता ओरॅकल आणि मायक्रोसॉफ्टमध्ये शर्यत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -