घरताज्या घडामोडीटाईट जीन्स घालणं पडलं महाग, मसल्स झाले डॅमेज

टाईट जीन्स घालणं पडलं महाग, मसल्स झाले डॅमेज

Subscribe

कपड्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय कपडा म्हणजे जीन्स असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. प्रत्येकवेळी जीन्समध्ये नवनवीन फॅशन येत असतात आणि प्रत्येत फॅशनची जीन्स आपल्याकडे आसावी असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे अनेकांच्या कपाटात जीन्सचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. पण हीच जीन्स एखादवेळेस जीवघेणीही ठरू शकते. तुमचा पायही कापावा लागू शकतो. हे आम्ही तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगत नाही आहोत. परंतु याचा प्रत्यय नुकताच एका महिलेला आला आहे.

jeans
jeans

२०१५ मध्ये, एका ऑस्ट्रेलियन महिलेची ही गोष्ट आहे. जगभरातील माध्यमांमध्ये ही गोष्ट छापली गेली आहे. जीन्समुळे ३५ वर्षीय महिलेला इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन जावे लागले.

- Advertisement -

ही महिला जीन्स घालून काम करत होती. यावेळी, ती वारंवार उठत होती, बसत होती. अचानक तिच्या पायावर दबाव येऊ लागला. तिला उभे राहणेही कठीण झाले. ती जशी होती त्या स्थितीत बसली, परंतु त्यानंतर परिस्थिती अधिकच खराब झाली. शेवटी, लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर डॉक्टरांच्या असे लक्षात आले की त्या महिलेचे पाय इतके सुजले की जीन्स कापण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

- Advertisement -

डॉक्टरांच्या मते, बरीच काळ घट्ट जीन्स घातल्यामुळे त्या महिलेच्या पायाचा रक्तपुरवठा खंडित होऊ लागला. व्यक्तीने हालचाल केली की  त्याच्यानुसार त्यांच्या शरीरातील रक्तपुरवठा प्रभावित होत असतो. परंतु जीन्स घट्ट असल्यामुळे  पायात ब्लॉकसारखी स्थिती निर्माण झाली. डॉक्टरांनी सांगितले की ही स्थिती घट्ट कपडे घातल्यामुळे झाली.

डॉक्टरांना आढळले की त्या महिलेच्या खालच्या पायांमधील स्नायू ब्लॉक झाले आहेत. जीन्समुळे पायांच्या स्नायूंचा रक्तपुरवठा कमी होत गेला आणि सूज वाढू लागली. अशा परिस्थितीत मूत्रपिंडावर दबाव वाढू लागतो, जो जीवघेणा देखील सिद्ध होऊ शकतो. जर योग्य वेळी उपचार न मिळाल्यास पाय कापायची वेळ येऊ शकतो.

या प्रकरणानंतर डॉक्टारांनी सल्ला दिला आहे, तुम्ही अजिबात घट्ट जीन्स घालू नका. एखादी जीन्स घातल्यास त्यामध्ये आपल्याला नीट चालत, टता, बसता येत आहे का हे तपासून बघा.


हे ही वाचा – पगारवाढीसाठी या देशात सैनिकांचे बंड? राष्ट्रपती- पंतप्रधानांना घेतलं ताब्यात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -