घरटेक-वेकस्वस्त झाला Samsung चा 6000mAh बॅटरी असणारा स्मार्टफोन; जाणून घ्या ट्रिपल कॅमेऱ्यासह...

स्वस्त झाला Samsung चा 6000mAh बॅटरी असणारा स्मार्टफोन; जाणून घ्या ट्रिपल कॅमेऱ्यासह इतर फीचर्स

Subscribe

तुम्ही चांगला बॅटरी बॅकअप असणारा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Samsung Galaxy F41 हा एक चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे सध्या फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक सेल चालू आहे, त्यामुळे तुम्ही लोकप्रिय ब्रँड असणारा स्मार्टफोन बर्‍याच स्वस्त किंमतीत खरेदी करू शकतात. Samsung Galaxy F41 च्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर 6000mAh बॅटरीसह इतर चांगले फीचर्स असणारा हा फोन खरेदी करण्याची चांगली संधी सध्या आहे.

या सेलमध्ये फ्लॅट डिस्काऊंट, एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय ऑफरसह अनेक प्रकारच्या ऑफर देखील दिल्या जात आहेत. या फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये आहे. हा फोनवर 6,500 रुपयांची सवलत असून हा स्मार्टफोन 14,499 रुपयात खरेदी करता येणार आहे. याशिवाय एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे, जेणेकरुन ग्राहकांनी त्यांचा जुना फोन एक्सचेंज केला आणि हा स्मार्टफोन घेतला तर त्यांना 13,950 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. जर ग्राहकांना संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास त्यांना हा स्मार्टफोन फक्त 549 रुपयांमध्ये मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

HDFC बँकेच्या कार्डवर आकर्षक ऑफऱ

ग्राहकांनी जर एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर त्यावर त्यांना 10% सूट मिळेल. यासह एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डमधून ईएमआय अंतर्गत पेमेंटवर 12% सूट देण्यात येणार आहे. या सॅमसंग डिव्हाइसमध्ये 6.4 इंचाचा 6.4 इंचाचा sAMOLED Infinity-U डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सल असा आहे आणि 20:9 चे आस्पेक्ट रेश्यो आहे. हा फोन कंपनीच्या Exynos 9611 प्रोसेसरसह येतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित असून बेस्ड सॅमसंगच्या OneUI स्कीनसह उपलब्ध आहे.

Galaxy F41 च्या रिअर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमर सेन्सर, तसेच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 5 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा फोनमध्ये देण्यात आला आहे. बॅटरीसाठी, Galaxy F41 मध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी देखील या स्मार्ट फोनला देण्यात आली आहे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -