घरटेक-वेकसॅमसंग गॅलक्सी S10 सीरीज लाँच

सॅमसंग गॅलक्सी S10 सीरीज लाँच

Subscribe

सॅंमसंग गॅलक्सीने s10 चे एकाचवेळी चार वेगवेगळ फोन लॉंच केला आहेत. जाणुन घेऊयात काय आहेत फिचर्स.

आजच्या काळात तुम्ही कोणते कपडे घालता, यापेक्षा तुम्ही कोणता मोबाईल वापरता. यावरुन तुम्ही अपडेट आहात की नाही ते ठरवल जाण्याचा जमाना आहे. तेव्हा आता अपडेट राहण्याच्या युगात सॅमसंग गॅलक्सीने एकाच वेळी s10 चे चार फोन लॉंच केले आहेत. S10, S10e, S10+ आणि S10 5G हे वेगवेगळी फीचर्स असलेले चार पर्याय सॅमसंग गॅलक्सीने दिले आहेत. त्याच सोबत गॅलक्सी बडस इयरबडस, गॅलक्सी वॉच अॅक्टिव स्मार्टवॉच, गॅलक्सी स्मार्ट फोन, गॅलक्सी फिट हि काही स्मार्ट टेक्नॉलॉजी असलेली उपकरणे देखील लॉंच करण्यात आली आहेत.

काय आहेत फीचर्स

या फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. या फोनचे लॉक उघडण्यासाठी डिस्प्ले वर बोटाने स्कॅन केल्यावर तुमचा फोन अनलॉक होणार आहे. अल्ट्रास्कॅनीग फिंगरप्रिट अस या फीचरचे नाव आहे. तसेच पावर शेअर, म्हणजे तुम्हाला तुमच्या फोनचा वापर वायरलेस चार्ज सारखा वापरता येणार आहे. एका फोन मधून दुसऱ्या फोनमध्ये पॉवर शेअर करता येणार आहे. आधीच्या सीरीजपेक्षा अधिक चांगला असा याचा डिस्प्ले असणार आहे. या फोनच्या मागच्या साईडला ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे. तसेच दोन्ही बाजूला गोरीला ग्लास असणार आहे. या सोबतच लॉंच करण्यात आलेल्या इतर उपकरणांची देखील वायरलेस चार्जिंग करता येणार आहे.

- Advertisement -

वायरलेस इयरबर्डस 

या सोबत लॉंच करण्यात आलेल्या वायरलेस बडस इयरबडस मुळे फोन वर बोलणे आणि गाणे ऐकणे या दोन्ही गोष्टी शक्य होणार आहेत. तसेच पावर शेयरिंग द्वारे चार्जिग करता येणार आहे.

हि आहेत खास वैशिष्ट्य

डिस्प्ले – ६.४ इंच एचडी डिस्प्ले
प्रोसेसर – ७ एन एम ६४ बीट ऑक्टा कोर
रॅम – ८ जीबी / १२ जीबी
स्टोरेज – १२८ जीबी/ ५१२ जीबी
कॅमेरा – ट्रिपल बॅक कॅमेरा, १२ मेगा पिक्सचल, १० मेगा पिक्सचल सेल्फी
बॅटरी – ४१०० मेगा वॅट सी. टाईप फास्ट चार्जर
किमंत – S10e $749, S10 $899, S10 +$999
(भारतीय किंमत अद्याप जाहीर झालेली नाही)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -