व्हॉट्स अ‍ॅपवर आता फन स्टिकर्स

व्हॉट्स अ‍ॅप आता आपल्या युजर्ससाठी फन स्टिकर्स हे नवं अपडेट घेऊन येत आहे. आयओएस आणि अँड्रॉईडवरील सर्व युजर्ससाठी फन स्टीकर्स आणत असल्याची घोषणा व्हॉट्स अ‍ॅपकडून करण्यात आली आहे.

whatsapp
प्रातिनिधिक फोटो

व्हॉट्स अ‍ॅप हे सर्वात प्रसिद्ध अ‍ॅप आहे. त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे व्हॉट्स अ‍ॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन अपडेट्स घेऊन येत असतं. व्हॉट्स अ‍ॅप आता आपल्या युजर्ससाठी फन स्टिकर्स हे नवं अपडेट घेऊन येत आहे. आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टवर येणार्‍या आठवड्यात आयओएस आणि अँड्रॉईडवरील सर्व युजर्ससाठी फन स्टीकर्स आणत असल्याची घोषणा व्हॉट्स अ‍ॅपकडून करण्यात आली आहे. तर बर्‍याच लोकांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर अपडेटनंतर याच आठवड्यामध्ये हे स्टिकर्स आल्याची माहिती समोर आली आहे. व्हॉट्स अ‍ॅपच्या या फीचरमुळे आता युजर्स आता हाईक अथवा व्हीचॅटप्रमाणे आपल्या मूडप्रमाणे फन स्टीकर्स वापरून मजेने चॅट करू शकणार आहेत.

कसे मिळतील हे स्टीकर्स?

व्हॉट्स अ‍ॅपने केलेल्या घोषणेनुसार, या नव्या फीचरमध्ये व्हॉट्स अ‍ॅप युजर्शना टेक्स्ट इनपुट फिल्डमध्ये नवा स्टीकर पर्याय दिसेल. त्यानंतर त्यावर टॅप केल्यानंतर स्टीकर्सचा पूर्ण मेन्यू ओपन होईल. त्यानंतर तुम्ही तुमचा मूड असल्याप्रमाणे वा तुमच्या आवडचे फन स्टीकर्स चॅटमध्ये वापरू शकता. व्हॉट्स अ‍ॅपवर उपलब्ध असणार्‍या स्टीकर्सच्या बाबतीत इनहाऊस डिझायनर्सने हे स्टीकर्स बनविल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या फीचरबाबत कंपनीचे म्हणणे आहे की, याला जास्त प्रसिद्धी देण्यासाठी बर्‍याच थर्डपार्टी स्टीकर्स अ‍ॅपलाही यासोबत जोडण्यात आले आहे.

कसे जोडता येतील नवे स्टीकर्स?

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्स अ‍ॅपचा वापर करणार्‍या युजर्सना फेसबुकसारखेच आपल्या अ‍ॅपमध्ये स्टीर्स वेगळे इन्स्टॉल करावे लागतील. आता बर्‍याच युजर्सच्या मोबाईलवर हे फीचर दिसायला सुरुवात झाली आहे. मात्र व्हॉट्स अ‍ॅपचे लेटेस्ट अपडेट्समध्ये झाल्यानंतर तुमच्या फोनवर हे स्टीकर फीचर दिसायला लागेल.