घरठाणे1 डिसेंबर 2023 जागतिक एड्स दिन 2023 विविध कार्यक्रमांनी साजरा

1 डिसेंबर 2023 जागतिक एड्स दिन 2023 विविध कार्यक्रमांनी साजरा

Subscribe

१ डिसेंबर २०२३ रोजी “जागतिक एड्स दिन” निमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, ठाणे यांच्यामार्फत “जागतिक एड्स दिन-२०२३” या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जनजागृतीपर प्रभात फेरी व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. धिरज महांगडे, जिल्हा दंत शल्यचिकित्सक, डॉ. अर्चना पवार, वैद्यकीय अधिकारी, भिवंडी डॉ. बुशरा, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.गीता खरात, वैद्यकीय अधिकारी ठाणे महानगरपालिका डॉ. चेतना, शहरी क्षयरोग अधिकारी, मिरा भाईंदर मनपा डॉ. चकोर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश मोरे, ART नोडल अधिकारी डॉ. सुरेश महावरकर, FSW Community Master Trainer अनु स्वामी, बाय.आर.जी संस्था ज्योती रासकर, स्वास्थी संस्था अशिष बोरडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग ठाणे  रतन गाढवे, जिल्हा पर्यवेक्षक अशोक देशमुख, जिल्हा पर्यवेक्षक निलीमा पाटील हे अधिकारी उपस्थित होते.

सर्वप्रथम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे, जिल्हा दंतशल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार यांनी जनजागृतीपर प्रभात फेरीला हिरवा झेंडा दाखविला व प्रभात फेरीला सुरुवात झाली. जनजागृतीपर प्रभात फेरीची जिल्हा सामान्य रुग्णालय येथून सुरुवात होवून जॉन्सन मार्गे तीन हात नाका ज्ञानसाधना कॉलेज डी. डी. ऑफिस मार्गे – सामान्य रुग्णालय, ठाणे येथे सांगता झाली. या जनजागृतीपर प्रभात फेरीत १) बा. ना बांदोडकर कॉलेज, ठाणे, २) सहयोग कॉलेज ठाणे, ३) ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे, ४) आर.जे.ठाकूर कॉलेज, ५) परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, ठाणे, ६) सुशिलादेवी देशमुख कॉलेज, ऐरोली व सामजिक संस्था व एचआयव्ही-एड्स क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, प्रतिनिधी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी असे अंदाजे ५०० ते ६०० जण सहभागी झाले होते.

- Advertisement -

याप्रसंगी ठाणे येथील सहयोग आर.आर.सी महाविद्यालयाने एच.आय.व्ही-तपासणी विषयी “जनजागृतीपर पथनाट्य” सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. याप्रसंगी उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गंगाधर परगे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी उपस्थितांना एच. आय. व्ही. एड्स निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आरोग्य विभाग व सामाजिक संस्थांचे अभिनंदन केले, तसेच जिल्ह्यातील मोफत औषधोपचार व चाचणी करणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. वाय.आर.जी. केअर मार्फत ज्यूस बॉटल वाटप करण्यात आले. यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे यांच्या माध्यमातून CLHIV बालकांमध्ये घेण्यात आलेल्या पोस्टर पेंटिंग व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी व विद्यार्थीनींचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रमासाठी विविध मार्गाने सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्ती व संस्थांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर प्रभातफेरीमध्ये सहभाग घेणाऱ्या तसेच एचआयव्ही एड्स विषयी जनजागृती करणाऱ्या विविध महाविद्यालयांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपसंचालक, डॉ. अशोक नांदापूरकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी उपस्थितांना एच.आय.व्ही. एड्स विषयी व राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम व जिल्हा पातळीवरील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाविषयी माहिती देऊन जागतिक एड्स दिनांच्या घोषवाक्यानुसार (Lets Community Led) सर्वांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात एच.आय.व्ही.ची चाचणी करुन सर्व मित्र, नातेवाईक व जवळच्या व्यक्तींना याबाबत जागरुक करण्याचे अवाहन केले. यानंतर जागतिक एड्स दिन व सप्ताहामार्फत जिल्हा मुख्यालयाबरोबरच जिल्ह्यातील महानगरपालिका, तालुका स्तरावर देखील प्रभात फेरी, विविध स्पर्धा, अनेक अतिजोखमीचे गटांसोबत संवेदीकरण व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे यांच्यामार्फत करण्यात आले. या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त्‍ा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले, असे डापकू विभाग, सामान्य रुग्णालय, ठाणे चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रतन गाढवे यांनी कळविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -