घरठाणेरिक्षा प्रवासी महिलेच्या गळ्याला चाकू लावून लुबाडले

रिक्षा प्रवासी महिलेच्या गळ्याला चाकू लावून लुबाडले

Subscribe

सहा तासात रिक्षाचालक गजाआड

डोंबिवली । डोंबिवली पूर्वेतील देगावातून कल्याणमधील एपीएमसी मार्केटला जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या महिलेला निर्जनस्थळी नेऊन तिच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, पर्स असा एकूण 36 हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटून चोरटा पसार झाला. या रिक्षाचालकाला डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या सहा तासाच्या आत पोलिसांनी अटक केली. गुन्ह्यात सहभागी असणार्‍या आणखी दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनिल अशोक खिल्लारे (22) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

फिर्यादी महिला घरडा सर्कल येथून एपीएमसी मार्केट कल्याण येथे जाण्यासाठी रिक्षात बसल्या होत्या.रिक्षाचालक
आणि रिक्षात बसलेल्या दोघांनी संगनमत करून महिलेला कल्याण येथील बीएसयूपी बिल्डींग जवळील मैदान, न्यू गोविंदवाडी येथे निर्जनस्थळी नेवून रिक्षा थांबवली. रिक्षाचालक अनिलने महिलेच्या गळ्याला चाकू लावत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. रिक्षातील दोघांनी महिलेकडील रोख रक्कम, मोबाईल, पर्स घेऊन पलायन केले. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून सहा तासाच्या आत रिक्षाचालकाला अटक केली तर दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
प्रमुख आरोपी अनिल हा रिक्षाचालक असून त्याच्या बरोबर चोरीच्या गुन्हातील दोघे अल्पवयीन मुलांवर चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोड्याची तयारी असे एकूण चार गुन्हे डोंबिवली आणि वाशिंद पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या गुन्ह्यासाठी वापरलेली रिक्षा आणि चाकू पोलिसांनी हस्तगत केला आहे. डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, हवालदार सुनिल भणगे, विशाल वाघ, सचिन भालेराव, तुळशीराम लोखंडे, पोलीस नाईक हनुमंत कोळेकर, पोलीस अंमलदार शिवाजी राठोड यांनी गुन्ह्याचा यशस्वी तपास करीत गुन्हेगारांना अटक केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -