घरठाणेशहापुरात तालुकास्तरीय महाआरोग्य शिबीर संपन्न

शहापुरात तालुकास्तरीय महाआरोग्य शिबीर संपन्न

Subscribe

शहापूर । शहापूर तालुक्यातील शेंद्रूण येथे ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराकरता अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भारत मासाळ तसेच तालुका आरोग्य अधिकारी भाग्यश्री सोनपिंपळे उपस्थित होते. या शिबिरात 762 रुग्णांनी सहभाग घेतला.

यामध्ये प्रामुख्याने 28 स्त्री रोग, 94 हृदय रोग, 27 अस्थी रोग, 34 दंत रोग, 40 बालक, 39 त्वचा रोग, 31 पोटाचे विकार, 50 नाक-कान -घसा, 200 रक्तदाब, 94 मधुमेह, 25 रक्त-लघवी, 25 इसीजी, 30 कँसर इत्यादी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. या शिबीराकरिता हृदय रोग तज्ज्ञ डॉ. रोहित बोभडे, न्युरोलॉजिस्ट दिलराज कडलंस, बालरोग तज्ज्ञ डॉ. शाम राठोड, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अविनाश बढिये, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. देवयानी बढिये, त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरे, कान -नाक-घसा तज्ज्ञ डॉ. वैभव किरपण, दंत रोग तज्ज्ञ डॉ. वर्षा चव्हाण, अस्थी रोग तज्ज्ञ डॉ. विशाल साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ.रुपाली शेडगे, डॉ. मानसी गायकवाड, नेत्र चिकित्सक डॉ. विठ्ठल बढिये आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून योग्य तो औषधोपचार केला. या शिबीराकरता तालुकास्तरीय वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माता अधिकारी, प्रयोग शाळा तंत्रज्ञ वैज्ञानिक अधिकारी आणि आशा कार्यकर्त्या यांनी विशेष परिश्रम घेऊन महाआरोग्य शिबीर यशस्वी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -