बदलापूर येथे 25 आणि 26 फेब्रुवारी 2023 रोजी आंबेडकरी साहित्य संमेलन

बदलापूर येथे 25 आणि 26 फेब्रुवारी 2023 रोजी धम्मसिरी फौंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे साहित्य संमेलन श्री. जी हॉल, कात्रप चौक, बदलापूर पूर्व येथे होणार आहे. या संमेलनाचे उदघाटन डॉ भीमराव आंबेडकर हे करणार असून संमेलनाध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे हे असणार आहे, असे मुख्य संयोजक अनिल भालेराव यांनी कळविले आहे.

या साहित्य संमेलनात भव्य संविधान रॅली काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दोन दिवसीय साहित्य संमेलनात चार परिसंवाद, लेणीसंवर्धनावर व्याख्यान, दोन भव्य कवी संमेलन होणार आहेत. मान्यवर लेखकांचा सत्कार करण्यात येणार आहे.या मध्ये  कवी व लेखकांना विचारमंच उपलब्ध करून देणे, त्यांचे साहित्य समाजात पोहोचावे,समाजात साहित्य आंबेडकरी साहित्य वाचनाबरोबर जागृती करणे हा ही हेतू असल्याचे मुख्य संयोजक अनिल भालेराव यांनी सांगितले आहे. तरी समाजातील स्तरातील लोकांनी यात सहभाग घेऊन संमेलन यशस्वी करण्याचे आवाहन कार्यकारणी पदाधिकारी शामराव सोमकुवर, डॉ. संदीप भेले, सुनील दुपटे आणि डॉ नंदकुमार कांबळे यांनी केले आहे.