घरthaneआमदार किसन कथोरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न

आमदार किसन कथोरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न

Subscribe

मराठा आंदोलनाचे पडसाद ठाण्यात

भाजपाचे आमदार कथोरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ करण्यात आला. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन पेटले आहे. त्याचा परिणाम ठाण्यातही दिसून आला. आमदार कथोरे यांनी आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा आरोप मराठा समाजाचे ठाण्याचे जिल्हाप्रमुख रमेश आंब्रे यांनी केला आहे. त्यामुळे ठाणे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनाही मराठा समुदायाच्या आंदोलनकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. ठाणे शहरात मराठा आंदोलन आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केल्यावर राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात काही कामानिमित्त आमदार किसन कथोरे आले होते. त्यावेळी मराठा समाज जिल्हाध्यक्ष रमेश आंब्रे हे कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आमदार कथोरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आणि कथोरे यांच्या अंगरक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना बाजूला केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -