घरठाणेएमआयडीसी कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा

एमआयडीसी कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा

Subscribe

15 दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा

डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागात रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरण कामे करताना आतापर्यंत अनेकदा पाणी पुरवठा करणार्‍या जलवाहिन्या फुटल्या. परिणामी अनेकदा येथील नागरिकांना पाणी पुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी सोमवारी एमआयडीसी डोंबिवली विभागीय कार्यालयात धडक दिली. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गावात पाणी टंचाईसदृश्य स्थिती असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे त्याच 27 गावात असणारी डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी विभागात देखील गेल्या 15 दिवसांपासून पाणी समस्या निर्माण झाली आहे. आठवडाभरापूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रात्रीच्या वेळी टँकर लॉबीचे बिंग फोडण्यासाठी अचानक धाड टाकली होती आणि केडीएमसीने अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई केली तरी 27 गावातील पाणी टंचाईची समस्या कायम असल्याचे चित्र आहे.

एमआयडीसी निवासी विभागात रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरण कामाच्या वेळी अनेकदा पाणी पुरवठा करणार्‍या जलवाहिन्या फुटल्या. त्यामुळे अनेकदा येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. आता गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे रोजच्या पाणी टंचाईला संतापलेल्या मिलाप नगर, सुदर्शन नगर येथील नागरिकांनी सोमवारी एमआयडीसी डोंबिवली विभागीय कार्यालयात धडक दिली आणि अधिकार्‍यांना जाब विचारला. पाणी पुरवठा खात्याचे सहाय्यक अभियंता विजय धामापुरकर यांनी मोर्चेकर्‍यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मिलापनगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशच्या पदाधिकार्‍यांनी येथील रहिवाश्यांच्या सह्यांचे निवेदन धामापुरकर यांना दिले. त्यावेळी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ते काम पूर्ण होवून पाणी पुरवठा सुरळीत होण्यास अजून दोन महिने तरी लागणार असल्याचे उत्तर देण्यात आले. चर्चेअंती धामापुरकर यांनी पाणी पुरवठ्याबाबत सुधारणा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

- Advertisement -

आज आम्ही आज शांतपणे मोर्चा काढला आहे. एमआयडीसीने पाणी समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा आम्हाला यापुढे अधिक तीव्र असे आंदोलन करावे लागेल,असा इशारा यावेळी नागरिकांनी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना यावेळी दिला. या मोर्च्यात मिलापनगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचा अध्यक्षा वर्षा महाडिक, अरुण जोशी, आनंद दामले, राजु नलावडे, मुकुंद देव, विश्राम परांजपे, मिलिंद जोशी, संजय चव्हाण, सचिन माने आदी अनेक रहिवाशी सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -