घरठाणेठाण्यात विकासकामांमुळे वर्षभरात दोन हरणांसह सहा माकडांचा मृत्यू

ठाण्यात विकासकामांमुळे वर्षभरात दोन हरणांसह सहा माकडांचा मृत्यू

Subscribe

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात (शहरात) भक्ष्याच्या शोधात किंवा रस्ता चुकल्याने वन्य प्राणी येतात. यामध्ये, प्रामुख्याने वानर (माकडे), हरण आणि बिबट्या यासारख्या प्राण्यांचा समावेश आहे. त्यातच दिवसेंदिवस डोंगर परिसरात होणारे वाढते नागरिकरण वन्य (जीव) प्राण्यांच्या जीवावर बेतताना दिसत आहे. २०२० या वर्षात दोन हरणे आणि सहा माकडांना जीव गमवावा लागल्याची बाब पुढे आली आहे. तर याचदरम्यान दोन बिबट्यांनी लोकवस्ती दस्तक दिल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. सुदैवाने या बिबट्यांनी कोणालाही जखमी केले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाण्यात होणार्‍या विकासकामामुळे वनक्षेत्र कमी होत असल्याने वन्यप्राणी आढळत असताना माणसाने प्राण्यांच्या अधिवासात घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

येऊर, वागळे इस्टेट आणि घोडबंदर रोड हा बहुतांश परिसर डोंगराळ भागाच्या जवळ आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांत नागरिकरण झाले आहे. त्यातच, लोकवस्ती वन्य प्राणी राहणार्‍या परिसरात होत असल्याने वन्य प्राणी भक्ष्य आणि रस्ता चुकल्याने लोकवस्तीकडे वळताना दिसत आहेत.

- Advertisement -

प्रामुख्याने जंगली वानर या परिसरातील वाढलेल्या झोपडपट्टीतून टाकलेले अन्न खाण्यासाठी वावरताना दिसत आहेत. येथील प्रवाही वीज खांबांच्या संपर्कात आल्याने वानरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू होत आहे.

२०२० या वर्षात ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षात वानरांबाबत १९ तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये ६ वानरांचा मृत्यू झाला आहे. वानरांच्या तक्रारी वागळे इस्टेट, नौपाडा, मुंब्रा-कौसा या परिसरातून आल्या आहेत. तर हरणांसंदर्भात तीन तक्रारी घोडबंदर रोड, आनंदनगर येथून आल्या होत्या. यामध्ये दोन हरणांचा गेटच्या जाळ्यांमध्ये अडकल्याने मृत्यू झाला आहे. यावेळी एका हरणाच्या कळपामागे भटकी कुत्री मागे लागल्याने ते कळप लोकवस्तीत आल्याचे म्हटले जात आहे. या वर्षभरात दोन हरणांसह तीन वानरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर एका जखमी बिबट्यासह दोन बिबट्यांनी लोकवस्ती मागील काही महिन्यात आपले दर्शन ठाणेकरांना घडवले.

- Advertisement -

प्राण्यांचे बळी रोखण्यासाठी सूचना
वागळे इस्टेस्ट परिसरात आठवड्यात घडलेल्या दोन घटनांमध्ये तीन वानरांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या घटनांची दखल घेत येऊर वनविभागाने ठाणे वनविभागाला पत्रव्यवहार करत वारंवार घडणार्‍या या घटना रोखण्यासाठी योग्य पावले उचलण्यास सांगितले आहे. यांच्याबरोबर काही सूचनाही केल्याचे वनविभागाने सांगितले.

‘ठाणे शहरातील डोंगराळ भाग असलेल्या परिसरात बिबट्यासह हरण आणि माकडांचा नेहमीच संचार पाहण्यास मिळतो. या वर्षभरात दोन हरणांचा आणि तीन वानरांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर, दोन बिबट्यांनी लोकवस्ती असलेल्या भागात हजेरी लावली आहे. यामध्ये एका जखमी बिबट्याचा समावेश आहे.’ – राजेंद्र पवार, वन अधिकारी, ठाणे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -