Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे झेप प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

झेप प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

कचरावेचक महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना महामारीचे संकट आले आहे. या संकटात कचारावेचक महीला महत्वाची भूमीक बजावत आहेत. याच  पार्श्वभूमीवर  झेप प्रतिष्ठान तर्फे मुलुंड शहरातील कचरावेचक महिलांना मासिक पाळी दरम्यान घेतल्या जाणाऱ्या आरोग्याच्या काळजीची महत्त्वपूर्ण माहिती देणयात आली. तसेच त्यांना वर्षभर पुरेल इतके सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात आले. त्याच सोबत मासिक पाळी दरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यावी, सॅनिटरी पॅडची विल्हेवाट कशी लावावी यावर ही मार्गदर्शन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात या महिलांना 3 महिने पुरेल इतके पॅड देण्यात आले. त्यानंतर पुन्हा त्यांच्या आरोग्याची माहिती घेऊन त्यांना प्रत्येक 3 महिन्यांनी हे वाटप करण्यात येईल.

 

- Advertisement -

आपल्या परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या या महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची संधी झेप प्रतिष्ठानला मिळाली असे झेप प्रतिष्ठानचे विकास धनवडे यांनी सांगितले. तसेच . तसेच सामाजीक संस्थांनी कचरावेचक महिलांना आरोग्यविषयी मार्गदर्शन केले पाहीजे. त्यांना मदत करण्याचे अवाहन विकास धनवडे यांनी केले. मासिक पाळी दरम्यान वापरण्यात येणारा कपडा पुन्हा पुन्हा वापरून आणि दमट जागी लपवून सुकवण्यात येतो त्यामुळे स्रियांना बरेच आजार होण्याची शक्यता असते. या दरम्यान स्वच्छतेच महत्व पटवून देने ही तितकेच महत्त्वाचे आहे.

मासिक पाळी हा कुठला श्राप नसून वरदान आहे ज्या मुळे सृष्टी चे चक्र अविरत चालू राहते आणि राहणार आहे. म्हणूनच या विषयावर बोलणं खूप गरजेचं आहे. आणि हाच प्रयत्न झेप प्रतिष्टान सॅनिटरी पॅड वाटपाच्या माध्यमातून करत आहे असे झेप प्रतिष्ठानच्या डॉ. प्राजक्ता लादे म्हणाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता हा उपक्रम अत्यंत कमी वेळात आणि सोशल डिस्टन्सचे नियम पाळत करण्यात आला. या उपक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे झेप प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्यांनी तसेच डम्पिंग ग्राउंड वरील महिलांनी आभार मानले.

- Advertisement -