घरठाणेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीचे आंदोलन यशस्वी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीचे आंदोलन यशस्वी

Subscribe

शहापूर । शहापूर तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी जागा मिळावी यासाठी सुरू असलेले घर छोडो आंदोलनाला अखेर 75 व्या दिवशी यश आले. सरकारी प्रतिनिधींनी आश्वासन आश्वासनानंतर ‘घर छोडो आंदोलन’ आणि 14 एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी सुरू करण्यात आलेले बेमुदत उपोषणही 19 एप्रिल रोजी उपोषणकर्त्या रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती गायकवाड आणि त्यांचे पती सत्यकाम पवार यांनी स्थगित केले आहे.

शहापूर तालुक्यातील तहसीलदार कोमल ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव मंजूर करावा अशा लेखी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. जिल्हा अधिकारी यांनी लवकरात लवकर शहापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात स्मारकास परवानगी मिळणे बाबत प्रयत्न करू असे आश्वासन दिल्याचे उपोषणकर्त्या रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती गायकवाड आणि त्यांचे पती सत्यकाम पवार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले 14 एप्रिल रोजी उपोषणकर्त्या ज्योती गायकवाड यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल शासनाकडून घेण्यात आली आहे. या आंदोलनाला पाठिंबा आणि बळ देणार्‍या सर्व भीम सैनिकांचे माता भागिनींचे मनापासून आभार गायकवाड दाम्पत्याने मानले आहेत. तसेच भदंत शीलबोधी थेरो यांनी आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनाला यशस्वी केले त्या बद्द्ल संपूर्ण समाजाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी भिमसैनिकांनी गायकवाड दांपत्याचा सन्मान करत फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -