घरठाणेसमूह राष्ट्रगीत गायनासाठी ठाणे महापालिकेत सर्व स्तब्ध

समूह राष्ट्रगीत गायनासाठी ठाणे महापालिकेत सर्व स्तब्ध

Subscribe

ठाणे – भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात सर्वत्र ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ आणि ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी बुधवारी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘समूह राष्ट्रगीत गायन’ पार पडले.

हेही वाचा – उत्सव 75 ठाणे! मराठी परिभाषा शब्दकोश प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

- Advertisement -

शासनाने दिलेल्या मार्गदर्शकसुचनेनुसार सकाळी बरोबर ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त जी.जी.गोदेपुरे, उप आयुक्त वर्षा दीक्षित यांच्यासह महापालिकेचे इतर वरिष्ठ अधिकारी, तसेच महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – ठाणेकरांसाठी खूशखबर! बारवी धरण काठोकाठ भरलं, पाण्याची चिंता मिटली

- Advertisement -

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात समूह राष्ट्रगीत गायन उत्साहात

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित स्वराज्य महोत्सवअंतर्गत आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात झाले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -