घरक्राइमपोलीस नाईक अनिता वाव्हळ यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट, पतीला अटक

पोलीस नाईक अनिता वाव्हळ यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट, पतीला अटक

Subscribe

ठाणे – ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस नाईक अनिता भीमराव वाव्हळ यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यातच गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी महिला कक्षेत पंख्याला ओढणीने गळफास घेतला. याप्रकरणी चौकशी करण्याकरता अनिता वाव्हळ यांच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. यावेळी तो सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याने अनिताने आत्महत्या केली असल्याचं निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी अनिता यांच्या आत्महत्येला जबाबदार धरत त्यांच्या पतीला अटक केली आहे.

हेही वाचा – महिला पोलीस नाईक अनिता व्हावळ यांची श्रीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्या

- Advertisement -

अनिता व्हावळ यांनी आत्महत्या केल्यानंतर विजय झिने याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तो सतत तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, तसेच तिला मानसिक आणि शारीरिक छळ करायचा असं या तपासातून निष्पन्न झालं. तसंच, तो पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करायचा असेही उघडकीस आले. त्यामुळे पतीच्या जाचाला कंटाळून अनिता यांनी आत्महत्या केल्याची निष्पन्न झाले आहे. अनिता यांच्या पश्चात दोन मुली असून मोठी मुलगी दहावीला असून लहान मुलगी सहावीला आहे.

हेही वाचा – ठाण्यात हस्तीदंताच्या विक्रीचा प्रकार ; अडीच कोटींच्या हस्तीदंतासह दुकली गजाआड

- Advertisement -

याप्रकरणी विजय झिने दोषी आढळल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात भादवि ४९८ अ आणि ३०६ प्रमाणे मानसिक, शारीरिक छळ करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -