भिवंडी ग्रामीण भागात ५८ टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

कोरोना पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण हा पर्याय शासनाने स्वीकारला परंतु ग्रामीण भागात आज ही असंख्य पालकांकडे स्मार्ट फोन नसणे व ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क ची वानवा यामुळे या ग्रामीण भागातील तब्बल ५८ टक्के विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहिले असून फक्त ४२ टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेत असल्याचे पंचायत समिती शिक्षण विभाग कडील आकडेवारी वरून समोर आले आहे.

कोरोना काळात अन लॉक काळात टप्याटप्याने विविध आस्थापने सुरू करीत असताना शासनाने शाळा ऑनलाईन सुरू करण्या बाबत धाडस केले परंतु ऑनलाईन शिक्षणास शहरात थोडया फार प्रमाणात यश येत असले तरी ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण राबविणे जिकरीचे असल्याने हजारो विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणा पासून वंचित राहणे ही चिंतेची बाब आहे. भिवंडी तालुक्यात एकूण ३०८ जिल्हा परिषद शाळांमधून तब्बल ७०९६९ विद्यार्थी शिक्षण घेत असून सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणाचा लाभ ३३०६३ विद्यार्थी घेत आहेत तर ३७९०६ विद्यार्थी ऑफलाईन शिक्षण घेत असून २९८७० विद्यार्थ्यांच्या पालकांकडे फक्त स्मार्टफोन असल्याची माहिती पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी नीलम पाटील यांनी दिली आहे .

सध्या शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन म्हणून कोरडी शिधा धान्य वितरण शिक्षकांच्या माध्यमातून सामाजिक अंतर राखून करण्यात येत असून जून पर्यंत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ किलो ४०० ग्रॅम प्रमाणे ७५१५० किलो तांदूळ ,९०० ग्रॅम प्रमाणे २४८०४ किलो हरभरा व ६०० ग्रॅम मुगडाळ प्रमाणे १२४०० किलो तर सहावी ते आठवी दरम्यानच्या विद्यार्थ्यांना २७०६० किलो तांदूळ ,१३५१२ किलो हरभरा ,१३५१२ किलो मुगडाळ वितरण शाळां मध्ये शिक्षकांनी केले असल्याची माहिती पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी नीलम पाटील यांनी दिली आहे. एकूण आकडेवारीचा प्रमाण पाहता –

एकूण विद्यार्थी संख्या ७०९६९

ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी संख्या ३३०६३ – ४६.५८ %
ऑफलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी संख्या ३७९०६ – ५३.४१%
स्मार्ट फोन धारक विद्यार्थी पालक संख्या २९८७० – ४२.०८%

भिवंडी तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असल्याने ३०८ शाळां मधून ९५५ शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत असताना पंचायत समिती शिक्षण विभागात ४ विस्तार अधिकारी पदे रिक्त असून गटशिक्षणाधिकारी यांना प्रशासकीय व शाळा भेटीसाठी वाहन नसल्याने कामावर मर्यादा पडत असून ,नुकताच पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा झाला परंतु यंदा कोरोना मुळे सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन कोठेही करण्यात आले नसल्याने शिक्षकांनी कोरोना काळात केलेले सेवकार्या व त्यांच्या ज्ञानदान कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थँक्स टू टीचर हा ऑनलाईन उपक्रम गटशिक्षणाधिकारी नीलम पाटील यांनी राबविला असता त्या उपक्रमात शेकडोंच्या संख्येने पालक विद्यार्थी यांनी उपस्थिती लावून शिक्षकांच्या कार्य बद्दल प्रशंसा केली आहे .

हेही वाचा –

विरोधकांना राजकारण करायचं, आम्हाल न्याय द्यायचाय; पवारांचा मराठा आरक्षणावरुन भाजपवर निशाणा