घरठाणेकळवा रुग्णालयातील हॉस्टेल स्थलांतर लांबणीवर

कळवा रुग्णालयातील हॉस्टेल स्थलांतर लांबणीवर

Subscribe

महावितरणचे मीटर न बसल्याचे कारण आले पुढे 

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या कायापालटाला सुरू झाली आहे. त्यासाठी येथील वसतीगृहाचे अर्थात हॉस्टेलचे स्थंलातर आषाढी एकादशी आणि बकरी ईदचा मुहूर्त साधून आलेल्या सुट्टीच्या दिवशी केले जाणार होते. मात्र महावितरण कडून त्या ठिकाणी मीटर उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे हॉस्टेल स्थलांतराची वारी लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच डॉ. काशिनाथ घाणेकर या ठिकाणी मागील बाजूस २३ मजल्यांच्या इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर सुमारे २०० डॉक्टरांना ये- जा करण्यासाठी परिवहनची मोफत बस सेवा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. असेही सांगितले.

कळवा बुधाजी नगर येथे ठाणे महापालिकेचे हे रुग्णालय आहे, याठिकाणी ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा, ऐरोली, दिघा आदीसह जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून रोजच्या रोज १,५०० हून अधिक रुग्ण तपासणीसाठी येत असतात. सध्या या रुग्णालयात ५०० च्या आसपास खाटा आहेत. परंतु मागील काही महिन्यात रुग्णालयावरील ताण वाढला आहे. दरम्यान ही बाब लक्षात घेऊन आयुक्त अभिजीत बांगर यांनी  रुग्णालयाची क्षमता पाचशे खाटांवरून १ हजार खाटांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रुग्णालयासह येथील हॉस्टेलची देखील पाहणी केली होती. त्यावेळेस त्यांना अनेक त्रुटी देखील निदर्शनास आल्या होत्या. त्यानुसार या त्रुटी दूर करण्याबरोबर चांगल्या दर्जाचे हॉस्टेल सुरु करण्याबाबतच्या सुचना देण्यात आल्या होत्या. तसेच येथील शिकाऊ किंवा इतर डॉक्टरांना न हलविता ती सुविधा उपलब्ध करुन देण्यालाही प्राधान्य देण्याचे त्यांनी सांगितले होते.

- Advertisement -

त्यानुसार महापालिकेने त्या दृष्टीने जागेचा शोध घेतला, असता डॉ. काशिनाथ घाणेकर या ठिकाणी मागील बाजूस २३ मजल्यांच्या इमारतीत आता हे स्थलांतर करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती महापालिकेतील वरीष्ठ सुत्रांनी दिली. त्यानुसार गुरुवारी सुट्टीच्या दिवशी हॉस्टेल स्थलांतर करण्याचे निश्चित केले होते. परंतु येथील मीटर बसविण्याचे काम अर्धवट असल्याने ते पूर्ण झाल्यानंतरच येथे स्थलांतर केले जाईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -