घरठाणेफुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी मनसेचा आंदोलनाचा इशारा

फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी मनसेचा आंदोलनाचा इशारा

Subscribe

मुरबाड शहरातील फुटपाथवरील वाढते आक्रमण नगरपंचायत प्रशासनाने त्वरीत हटवावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शहर मनसे शाखेने नगरपंचायत प्रशासनाला दिला आहे. मुरबाड नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील फुटपाथ वरील अतिक्रमनाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहराच्या मुख्य प्रवेशद्वार ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि राम मंदिरापर्यंत मोठ्या प्रमाणात सर्वत्र अतिक्रमण वाढत आहे. विना परवाना डिजिटल फलकाचा देखील यात समावेश आहे. याबाबत मुरबाड नगरपंचायत मात्र कोणत्याही प्रकारची उपाय योजना करताना दिसत नाही. त्यामुळे मुरबाड शहराला विद्रुपीकरनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.अतिक्रमण फुटपाथवर व नागरिक रस्त्यावर असे चित्र सध्या मुरबाड शहरात दिसत आहे. मुरबाड शहरात भाजी मंडई असतानाही दररोज फुटपाथवर भाजी विक्री करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या मात्र मुरबाड नगरपंचायतीने याबाबत अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. दिवसेंदिवस विविध टपऱ्या व विविध खाद्य पदार्थांची दुकाने वाढताना दिसत आहेत. मुरबाड शहरातील रस्त्यावर लाखो रूपये खर्च करून ब्लॉक बसविण्यात आले आहेत. मात्र खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यांनी या ठिकाणी अतिक्रमण केल्याने फुटपाथच गायब झाले आहे.

खाद्य पदार्थ गाड्यांसमोर विविध प्रकारची वाहने बेशिस्तपणे लावलेली असतात. त्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. मुरबाड नगरपंचायत लाखो रुपये खर्च करते मात्र सर्वत्र अतिक्रमणाचा विळखा मुरबाड शहराला पडला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुरबाड मधील नागरिक व विद्यार्थी यांसकडून वारंवार तक्रारी होत असताना जर 8 दिवसांच्या आत मुरबाड शहरातील हे अतिक्रमण हटविले नाही तर मनसे स्टाईलने मुरबाड नगरपंचायत कार्यालयावर तीव्र मोर्चा काढण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड निर्वाचित शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव यांनी नगरपंचायतीला दिला आहे. आंदोलनाचा इशारा देताच मुरबाड नगरपंचायती ने या अतिक्रमण धारकांना नोटीस बजावल्या आहेत.तर यापूर्वी ही अश्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या , फेरीवाले व अतिक्रमण धारकांना जागा उपलब्ध करून देण्याची मागणी फेरीवाला संघटनेने यापूर्वी केली होती मात्र जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊनही जागा उपलब्ध न झाल्याने हा संघर्ष पेटतो कि विझतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र फूटपाथ मोकळे झाले पाहिजे याची मागणी वारंवार होताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -