घरठाणेतरतूद नसतानाही चांगल्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव

तरतूद नसतानाही चांगल्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव

Subscribe

अधिकार्‍यांसह 15 जण चौकशीच्या फेर्‍यात

खराब रस्त्याच्या डांबरीकरणाच्या तरतुदीकडे लक्ष न देता बांधकाम विभागातील अधिकार्‍यांनी चकाचक व सुटसुटीत असलेल्या रस्त्यांकरिता सुमारे साडेसात कोटींचा दुरुस्तीचा प्रस्ताव तयार केला. हा प्रकार आयुक्तांच्या नजरेतून सुटला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव आता अधिकार्‍यांच्या अंगलट आला आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांनी अर्थसंकल्पात अशा स्वरूपाची तरतूदच केली नसल्याने याप्रकरणी बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर इतर दोन अधिकारी यांच्यासह 15 जणांवर कारणे दाखवा नोटीस बजावल्याने पालिकेत या घटनेने खळबळ उडाली आहे.

कल्याण पश्चिम येथील फडके मैदान म्हसोबा मैदान या प्रभागातील रस्ते सुस्थितीत असतानाही बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेसात कोटी रुपयांचे डांबरीकरण करण्याकरिता प्रस्ताव तयार केला होता. डांबरीकरणाचा या प्रस्तावाची फाईल आयुक्त दांगडे यांच्या कडे अंतिम मंजुरीसाठी आली होती. मात्र गेल्या आठवड्यात महापालिकेच्या कार्यालयातूनच फाईल अचानक गहाळ झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने याप्रकरणी शिपायाला निलंबित करण्यात आले होते. अर्थसंकल्पात तरतूद नसताना बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडून रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव बनविला गेल्याने आयुक्तांनी याबाबत अधिकार्‍यांची चौकशी आदेश जारी केले आहेत. यात 15 जण चौकशीच्या फेर्‍यात आहेत. पालिकेतील नागरी कामांचे प्रस्तावित कामे तत्कालीन नगरसेवक आपले नाव पुढे येऊ न देता आपल्या हस्तकारमार्फत ठेका घेत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात चर्चेली जाऊ लागली आहे. अर्थसंकल्पात रस्ता दुरुस्ती संदर्भात तरतूद नसताना प्रस्ताव बनविला गेल्याने तसेच अनेक बाबींबाबत आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांच्या निदर्शनास कामातील अनियमितता आल्याने ही कारवाई झाली. अशी माहिती सार्वजनिक प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी दिली आहे.

- Advertisement -

फाईल मिळत नसल्याने शिपाई निलंबित
कल्याण डोंबिवली महापालिकेतील ठेकेदार अनेकदा नागरी कामांच्या प्रस्तावित फाईल आपल्याच हाताने अधिकार्‍यांच्या दालनात मिरवताना दिसून येत असतात. शिपायांमार्फत सहीसाठी दुसर्‍या अधिकार्‍याच्या केबिनमध्ये फाईल घेऊन गेल्यास संबंधित अधिकारी त्या फाईलवर लवकर सही करीत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ठेकेदार संबंधित फाईल स्वतः घेऊन जात त्या फाईलवर सह्या घेण्याचे काम करीत असतो. गेल्या आठवड्यात मुख्यालयातून फाईल गहाळ झाल्याचे आढळून आल्याने संबंधित शिपायाला निलंबित केले गेले आहे. सीसीटीव्ही फुटेजची पाहाणी करून गहाळ झालेली फाईल नेमकी कोणाला देण्यात आलेली होती याची चौकशी पोलीस करीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -