घरठाणेठाण्यात सूर्यनारायण तापला

ठाण्यात सूर्यनारायण तापला

Subscribe

 सरळ पाच दिवस तापमानात १ अंशाने झाली वाढ, अंगाची होतेय लाहीलाही, नागरिक हैराण

गेल्या पाच दिवसांपासून ठाणे शहरात अक्षरशः सूर्यनारायण चांगलाच तापल्याचे भासत आहे. याच दिवसात दिवसाआड एक अंशाने तापमानात वाढ होत असल्याने वाढत्या उकाड्याने ठाणेकर नागरिक हैराण झाले आहेत. मंगळवारी तर ठाणे शहराच्या तापमानाचा पारा हा ४२.८ अंश इतका वर चढला होता. गेल्या अकरा दिवसातील हा उंचाक आहे. यामुळे दिवसा रस्त्यावर ये-जा करताना अंगाला चटके लागत असल्याने अंगाची लाहीलाही होत होती. अचानक वाढत असलेल्या या तापमानाने ठाण्याचे नागपूर होण्यास वेळ लागणार नाही. अशी भीती ठाणेकर नागरिकांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. त्यातच ठाणे शहरात १ एप्रिलपासून तापमानाचा पारा वाढू लागला. या दिवशी ३७.२ अंशावर तापमान गेले होते. त्यानंतर ६ एप्रिल रोजी या तापमानाने अचानक ४१.३ अंश सेल्सिअस गाठले होते. ७ एप्रिल रोजी तापमान ३८.७ वर आले. मात्र ८ एप्रिलपासून सूर्य नारायण चांगलाच तापू लागला. ९ एप्रिलला हे तापमान ४१ अंशावर गेले. १० एप्रिल रोजी तापमानात पुन्हा वाढ झाली ते तापमान ४२.१ वर गेले तर ११ एप्रिल हे तापमान ०.७ अंशाने वाढल्याने तापमानाचा पारा हा ४२.८ इतका झाला होता. या वाढत्या तापमानामुळे ठाणेकर नागरिक ही चांगले हैराण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -