घरठाणेसंजय राऊतांनी एकांतात बडबडण्याची  सवय करावी

संजय राऊतांनी एकांतात बडबडण्याची  सवय करावी

Subscribe

राज ठाकरेंचा संजय राऊतांना टोला

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत शिवसेनेचे  नेते संजय राऊत यांची नक्कल केली. त्यावरून राऊत यांनी नकला करून राजकारण होत नाही, असा सल्ला राज ठाकरे यांना दिला होता. या सल्ल्यानंतर राज ठाकरे यांनी राऊत यांना ‘राऊतांनी एकांतात बडबड करण्याची सवय करून घ्यावी’ असे प्रत्युत्तर दिले आहे.

मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या दिवा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसेच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. याचाच भाग म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे त्यांनी उद्घाटन केले. या वेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत,अभिजित पानसे तसेच ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -