घरठाणेअंबरनाथमध्ये लापसीया हॉस्पिटलमध्ये दरोडा

अंबरनाथमध्ये लापसीया हॉस्पिटलमध्ये दरोडा

Subscribe

अंबरनाथमध्ये हॉस्पिटलमध्ये दरोडा, एक कोटींचा ऐवज लुटला

अंबरनाथमध्ये कानसई भागातील डॉक्टर हरिष लापसिया यांच्या घरावर चार सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा घालून सुमारे एक कोटींचे सोने हिर्‍यांचेचे दागिने लुटून नेले. पोलीस दरोडेखोरांचा कसून शोध घेत आहेत. अंबरनाथ कानसाई भागात डॉक्टर हरिष लापसीया यांचे उषा नर्सिंग होम नावाचे हॉस्पिटल आहे. या हास्पिटलच्या वरच्या माळ्यावर लापसीया कुटुंब राहाते. सोमवारी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी हातात शस्त्र घेऊन चार जण हॉस्पिटलमध्ये घुसले.

आत येताच त्यांनी हॉस्पिटलमधील नर्स आणि आया, इतर स्टाफला चाकूचा धाक दाखवून त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले. त्यांना रुग्णांच्या खोलीत बंद करून बाहेरून दरवाजा लावला. नंतर वरच्या माळ्यावर डॉक्टर लापसीया यांच्या खोलीत जाऊन कपाट फोडून दागिने काढले. यावेळी डॉ. उषा लापसीया उठल्याने दरोडेखोरांनी त्यांचे तोंड दाबून चाकूचा धाक दाखवला आणि दागिने लुटून नेले. यावेळी डॉ हरिष लापसिया हे शेजारच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट तपासत होते. दरोडेखोरानी पळून जाताना नर्सिंग होममध्ये लावलेला सीसीटीव्हीचा डिव्हीआर काढून नेला.

- Advertisement -

दरोडेखोरांनी एक कोटी रुपयांचे सोने आणि हिर्‍यांचे दागिने लुटून नेले आहेत. डॉ उषा लपसिया आणि नर्स आया यांनी आरडाओरडा केला असता त्यांचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. त्यांनी सर्वांची मुक्तता केली. दरोड्याची खबर मिळताच पोलीस निरीक्षक भोगे, एसीपी सातव, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते घटनास्थळी दाखल झाले. दुसरीकडे उल्हासनगर गुन्हा अन्वेषण विभागाने देखील या दरोड्याचा समांतर तपास सुरू केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली. काही महिन्या पूर्वी डॉ उषा लापसिया यांच्याच हास्पिटलसमोर त्यांच्या गळ्यातून सोन्याची साखळी दोन चोरांनी हिसकावून पळवून नेली होती. पोलिस श्वान पथक आणि या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -