घरठाणेशहापुरात शिवसेनेने गड राखला

शहापुरात शिवसेनेने गड राखला

Subscribe

सतरा पैकी १० जागांवर शिवसेना, भाजप ७ जागांवर विजयी, शहापूर नगरपंचायत निवडणूक,

ठाणे जिल्हयातील शहापूर शहरातील नगरपंचायत निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला नगरपंचायतीवर १७ पैकी १० जागांवर शिवसेनेने उमेदवार विजयी झाले तर ७ जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले. या अभूतपूर्व आणि धक्कादायक निकालाकडे राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपा पेक्षा सर्वाधिक जागांवर शिवसेना उमेदवारांनी विजय मिळविल्याने शहापुरात शिवसेनेने गड राखला आहे.

नगरपंचायतीवर एक हाती निर्विवाद सत्ता मिळवण्यासाठी भाजपा शिवसेनेने येथे प्रचंड राजकीय ताकद लावली होती. कुठल्याही परिस्थितीत नगरपंचायत निवडणुकीत यश संपादन करायचेच यासाठी खुद्द भाजपाचे केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील, भाजप आमदार किसन कथोरे, तर शिवसेनेचे राज्यातील नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. ठाणे जिल्ह्यातील राजकारणातील या चार वजनदार नेत्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा अक्षरशः येथे पणाला लावली होती. शहापूर नगरपंचायतीवर शिवसेना की भाजपा या दोन्ही पक्षांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते.

- Advertisement -

विजयी उमेदवार, शिवसेना- विजय भगत, गिता भोईर, अनंता झगडे, आश्विनी अधिकारी, गायत्री भांगरे, योगिता धानके, राजाराम वळवी, रणजित भोईर, रजनी शिंदे, कामिनी सावंत

विजयी उमेदवार, भाजप – विवेक नार्वेकर, विनोद कदम, हरेश पष्टे, विमल पष्टे, मिताली भोपतराव, योगेश महाजन, मनिषा अधिकारी

- Advertisement -

पराभूत उमेदवार, शिवसेना- संतोष शिंदे, सुधीर तेलवणे, सचिन तावडे, सुविद्या भोईर, सुभाष विशे, प्रद्या देशमुख, मयुरी म्हात्रे

पराभूत उमेदवार, भाजपा – मनोज पानसरे, अस्मिता आळशी, हिरा भांगरे, तनुजा धसाडे, भास्कर भांगरे, अरुण झवर, मकरंद चव्हाण, आळशी, वनिता अधिकारी, वैदही नार्वेकर

राष्ट्रवादी पराभूत, उमेदवार – सतिष पातकर, वैशाली सापळे, दिपेश विशे

इंदिरा काँग्रेस पराभूत- जान्हवी देशमुख, अपर्णा खाडे

पराभूत अपक्ष – ज्योती गायकवाड, स्वाती विशे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -