घरठाणेठाण्यात २९७ मद्यपींची पोलिसांनी उतरवली झिंग; अपघात विरहित नव्या वर्षाची सुरुवात

ठाण्यात २९७ मद्यपींची पोलिसांनी उतरवली झिंग; अपघात विरहित नव्या वर्षाची सुरुवात

Subscribe

शुक्रवारी रात्री ८ ते शनिवारी पहाटे २ वाजेपर्यंत हाती घेतलेल्या मोहिमेत मद्यपी, १८८ कलमासह ट्रिपल सीट जाणाऱ्या अशा एकूण ४४३ जणांवर कारवाई केली आहे.

ठाणे: सरत्या वर्षाबरोबर नूतन वर्षाचे स्वागतासाठी मदिरा प्राशन करून तर्र झालेल्या २९७ जणांची ‘झिंग’ ठाणे शहर वाहतूक नियंत्रण विभागाच्या पोलिसांनी उतरवली आहे.  शुक्रवारी रात्री ८ ते शनिवारी पहाटे २ वाजेपर्यंत हाती घेतलेल्या मोहिमेत १८८ कलमाअंतर्गत मद्यपी आणि ट्रिपल सीट जाणाऱ्या अशा एकूण ४४३ जणांवर कारवाई केली आहे. दरम्यान वाहतूक पोलिसांच्या वाहन तपासणी मोहिमेमुळे या वर्षाची सुरुवात अपघात विना झाल्याचा दावा ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी केला आहे.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहन चालकाविरुद्ध व बेदरकार वाहनधारकाविरुद्ध मोहीम हाती घेतली होती.  ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते १ जानेवारी पहाटे २ वाजेपर्यंत ३६ विशेष पथकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी अचानक नाकाबंदी लावण्यात आली. यावेळी मद्यपी वाहन चालकाविरुध्द व बेदरकार वाहनधारकाविरोधात सोबत जोडलेल्या चार्टप्रमाणे कार्यवाही करण्यात आली. यावेळी वाहतूक पोलिसांनी पीपी किट परिधान केले होते.

- Advertisement -

पहिल्या एक तासात ८८ मद्यपी, २४ केसेस १८८ कलमाप्रमाणे आणि १० ट्रिपल सीट वाहन चालकांवर अशा १२२ केसेस दाखल केल्या. त्यानंतर बारा वाजेपर्यंत १९५ केसेस दाखल करताना सर्वाधिक १३२ मद्यपी मिळून आले आहेत. तर १८८ कलमाप्रमाणे ५९ केसेस आणि ४ ट्रिपल सीट वाहन चालकांचा समावेश आहे. यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत आणखी ७७ मद्यपींवर कारवाई केली असून ४८ केसेस १८८ कलमाप्रमाणे वाहन चालविणाऱ्या आणि ०१ ट्रिपल सीट वाहन घेऊन जाणाऱ्यांवर अशा १२६ जणांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.


नात्याला काळिमा! ५० रुपये चोरले म्हणून पित्याकडून मुलाची निर्घृण हत्या


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -