घरठाणेठाण्यात संततधार सुरूच

ठाण्यात संततधार सुरूच

Subscribe

चोवीस तासात ८१.९६ मिमी पाऊस

अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला जात असताना, हवामान खात्याचा अंदाज कुठे तरी चुकताना दिसून आला आहे. ठाणे शहरात गेल्या चोवीस तासात ८१.९६ इतका मिमी पाऊस पडला आहे. तर गुरुवारी ८.३० पासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३२.२४ मिमी एवढाच पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या सकाळपासून दुपारपर्यंत शहरात ९ झाडे कोसळली असून तीन ठिकाणी पाणी साचले होते. तर एका ठिकाणी संरक्षण भिंतीला तडे गेलेले आहेत.
मुंबईला ऑरेंज आणि पालघरला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात खबरदारी घेण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासात म्हणजे बुधवारी सकाळी ८.३० ते गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ठाणे शहरात ८१.९६ मिमी पाऊस झाला. याचदरम्यान ६६ तक्रारी आपत्ती व्यवस्थापन कक्षेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये ३२ तक्रारी अवघ्या झाडे उन्मळून पडल्याचा आहेत. गुरुवारी सकाळपासून पाऊस संततधार सुरू आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ३२.२४  मिमी पाऊस झाला असून दुपारी साडेअकर ते दीड वाजेपर्यंत (दोन तासात) २४.९० मिमी झाला आहे.
या पावसामुळे कोलशेत तरीचा पाडा, वंदना एसटी डेपो जवळ आणि तीन पेट्रोल पंप येथे पाणी साचले होते. तर ९ ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे. यामध्ये ठाणे न्यायालयाच्या आवारात, माजी नगरसेवक हिरा पाटील यांच्या घरावरती झाड पडले आहे. कोपरी स्मशानभूमीत झाड पडले आहे. तर पातलीपाडा येथील महापालिका आयुक्तांच्या बंगल्याजवळ झाडाची फांदी महावितरणच्या ओव्हर हेड वायरीवरती तुटून पडली. दरम्यान वागळे इस्टेट रोड क्रमांक २२ येथील महापालिका उद्यानाची संरक्षण भिंतीला तडे गेले आहेत.तर पहाटे मुंब्र्यात एका घराच्या भिंतीचा काही भाग पडल्याने महिला जखमी झाली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
 सकाळच्या सत्रातील विद्यार्थी परतले माघारी
 जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे इयत्ता १२ वी पर्यंतच्या शाळांना दोन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी रात्री उशीरा जाहीर केला. परंतू, या निर्णयाविषयी गुरुवारी अनेक शाळा व्यवस्थापकांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून आले. रात्री उशिरा निर्णय झाल्यामुळे शाळा व्यवस्थापकांना हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता आला नाही. त्यामुळे अनेक शाळेत गुरुवारी सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पुन्हा घरी पाठविल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -