घरठाणेहोळीचा दिवस ठरला तक्रारींचा दिवस

होळीचा दिवस ठरला तक्रारींचा दिवस

Subscribe

दिवसभरात घडल्या दहा आगीच्या घटना

शहरात सोमवारी दिवसभरात तब्बल २७ घटना ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेत नोंदवल्या गेल्या. त्यातच होळीच्या दिवशी दहा ठिकाणी आगीच्या किरकोळ घटना समोर आल्या आहेत. यामध्ये दोन ठिकाणी झाडांना, कुठे गवताला तसेच कुठे कचर्‍याला आग लागली होती. तर चार ठिकाणी झाडे कोसळली असून दोन ठिकाणी झाडांच्या फंदया तुटून पडल्या आहे. एका ठिकाणी जाहिरातीचे फलक फडले आहे. सुदैवाने या घटनांमध्ये मात्र कुठे जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत ही झालेली नाही. याचदरम्यान अचानक रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. होलिका दहणानंतरही या पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा होता.

सोमवारी सकाळीच साडेआठ वाजण्याच्या सुमारास सावरकर नगर, या ठिकाणी रोडलगत असेलल्या इडली-मेदूवडा सांबारच्या हातगाडीवरील कमर्शियल एचपी-गॅस सिलेंडरच्या नोझल व पाईपला किरकोळ आग लागली. त्याच्यानंतर सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड, कासारवडवली नाका या ठिकाणी इमारतीचे नविन बांधकाम असल्याने तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या स्टोअर रूमला आग लागली.आगीच्या घटना सुरू झाल्या. त्यातच कळवा  खारेगाव टोल नाक्याजवळ कचर्‍याला,दिवा बेतवडेगाव या ठिकाणी टोरंट केबलला शॉर्ट सर्किट होऊन गवताला किरकोळ आगी लागल्या.पांच पाखाडी येथील मिलिंद मीरा सोसायटीच्या आवारातील आणि घोडबंदर रोड आनंदनगर येथे इन्कलेव्ह सोसायटीच्या आवारातील झाडाला आग लागली.

- Advertisement -

बाळकुम येथे महावितरणच्या विद्युत केबलला, शास्त्रीनगर येथील रेपटाक्रॉस कंपनीच्या आवारामध्ये कचर्‍याला आणि ब्रम्हांड येथे महावितरणच्या पोलवरील इलेक्ट्रिक केबलला आग लागली. या घटनांबरोबर घोडबंदर रोड,कापूरबावडी येथील एच.पी. पेट्रोल पंप बाजूला असलेला जाहिरातीचा फलक दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पडले. त्याचदरम्यान मुंब्रा , ठाकूर पाडा येथील तळ अधिक ५ मजली असलेल्या गणेश पॅलेस या इमारतीच्या टेरेस वरील सुरक्षा भिंत पडली. तर ढोकाळी , वागळे इस्टेट रघुनाथ नगर, वसंत विहार अशाप्रकारे चार ठिकाणी झाडे कोसळली, दोन ठिकाणी फलक अर्धवट तुटल्याचे दिसून आले. अशा एका मागून चोवीस तासांमध्ये एकूण २७ घटनांची नोंद झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. याचदरम्यान दुसरीकडे दुपारपासून जोराचा वारा वाहू लागला होता. त्यातच रात्री बारा वाजल्यानंतर अचानक अवकाळी पावसाने ही शहरात हजेरी लावली. तर कोपरीत गारपीट झाल्याचे बोलले जात आहे. या अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा पसरला होता. सकाळी काही प्रमाणात पावसाचेच वातावरण दिसत होते. पण काही प्रमाणात पावसाच्या हलकी सर येऊन गेली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -