घररायगडकुत्री चावल्याने ८ जण गंभीर जखमी[ एकदरातील होलिकोत्सवात अचानक विघ्न

कुत्री चावल्याने ८ जण गंभीर जखमी[ एकदरातील होलिकोत्सवात अचानक विघ्न

Subscribe

मुरूड तालुक्यातील एकदरा या गावात रविवारी सायंकाळी उशिरा एका पिसाळलेल्या कुत्रीने अचानक हल्ला करून ८ जणांंना जागोजागी चावे घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमींवर मुरूड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले ऐन .होलिकोत्सवात ही घटना अचानकपणे घडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

नांदगाव: मुरूड तालुक्यातील एकदरा या गावात रविवारी सायंकाळी उशिरा एका पिसाळलेल्या कुत्रीने अचानक हल्ला करून ८ जणांंना जागोजागी चावे घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमींवर मुरूड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले ऐन .होलिकोत्सवात ही घटना अचानकपणे घडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
या बाबत माहिती देताना एकदरा महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष तथा मुरूड तालुका मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष आणि हनुमान मच्छीमार सोसायटीचे चेअरमन पांडुरंग आगरकर, यांनी सांगितले की रविवारी सायंकाळी ७.३० ते ८ वाजण्याचे सुमारास एका भटक्या पिसाळलेल्या कुत्रीने आकस्मिकपणे धावत येऊन येथील महिला,पुरुष आदी ग्रामस्थांवर हल्ला करून चावे घेत लचके काढले आहेत.सदर कुत्री चावे घेत गावात सैरावैरा धावत सुटली होती.गुरे,वासरे देखील यातून सुटली नाहीत.सर्वजण भयभीत होऊन घरात बसले होते. या घटनेने होळी सणाच्या रंगाचा बेरंग झाला. ८ ग्रामस्थांना चावे घेऊन या कुत्रीने त्यांना गंभीर जखमी केले आहे.

कुत्रीचा केला बंदोबस्त
रविवारी रातोरात जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचबरोबर सर्व ग्रामस्थानी रुग्णालयात धाव घेतली. मुरूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ, आरोग्य विभाग, मुरूड नगरपरिषद आणि संबंधित विभाग यांची भेट घेऊन या घटनेची तक्रार तातडीने दाखल करण्यात आल्याची माहिती आगरकर यांनी दिली.रात्री सर्व ग्रामस्थ आणि युवकांनी या पिसाळलेल्या कुत्रीचा बंदोबस्त केल्याने ग्रामस्थ निर्धास्त झाले. आधिक उपचारासाठी जखमींना सोमवारी सकाळी म्हसळा तालुक्यातील पाबरे या गावी नेण्यात आले आहे.या घटनेचे पडसाद मंगळवारी धुळवडीच्या दिवशी देखील जाणवत होते.

- Advertisement -

गंभीर जखमींची नावे
जनार्दन हरीचंद्र पाटील, हर्ष जनार्दन पाटील, भीमा गोविंद पाटील, दिलीप पांडुरंग विहूरकर, रुपेश चंद्रकांत पाटील, वासंती टारझन मढवी, रितू राकेश गंबास, अक्षता प्रशांत मकू अशी आहेत.यातील ७० वर्षीय महिला भीमा गोविंद पाटील यांची प्रकृती आधिक गंभीर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -