घरठाणेसफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे मिळणार

सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे मिळणार

Subscribe

खारटन रोड येथील लफाट चाळीत राहणाऱ्या १९१ सफाई कर्मचाऱ्यांना पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप ) अंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये मालकी हक्काची घरे देण्यात येणार आहेत.

खारटन रोड येथील लफाट चाळीत राहणाऱ्या १९१ सफाई कर्मचाऱ्यांना पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप ) अंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये मालकी हक्काची घरे देण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत येथील सफाई कर्मचाऱ्यांनी सदनिका रिकामी केली असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या पगारातील घरभाडे व सेवाशुल्क माफ करण्यात येणार असल्याचे पत्र आज महापौर नरेश म्हस्के यांनी प्रातिनिधीक स्वरुपात १० कर्मचाऱ्यांना देण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमास उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक सुधीर कोकाटे, सुनील हंडोरे नगरसेविका नम्रता कोळी, विमल भोईर, मालती पाटील, माजी नगरसेवक पवन कदम, उपआयुक्त अशोक बुरपल्ले, स्थावर मालमत्ता विभागाचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर, प्रविण वीर, कामगार नेते बिरपाल भाल तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते. खारटन रोड येथील महापालिकेच्या मालकी हक्क असलेल्या जागेवर पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप ) अंतर्गत पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

या ठिकाणी राहत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारातून घरभाडे कपात करण्यात येत होते.‍ परंतु मा. महासभेने याबाबत एकमताने निर्णय घेवून कर्मचाऱ्यांच्या पगारातील घरभाडे कपात न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सद्यस्थितीत नवीन इमारतीच्या बांधणीसाठी १०० सफाई कर्मचाऱ्यांनी घरे रिकामी केली असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या पगारातील घरभाडे भत्ता व सेवाशुल्क कपात न करण्याबाबतचे पत्र आज महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापौर दालनात सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आले. तसेच जसजसे या लफाट चाळीतील घरे सफाई कर्मचारी रिकामी करतील त्या प्रमाणे त्यांचेही घरभाडे कपात केले जाणार नाही.

यासाठी उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक सुधीर कोकाटे, सुनील हंडोरे, स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी, , माजी नगरसेवक पवन कदम, जयेंद्र कोळी यांनी सतत प्रशासनासोबत पाठपुरावा करुन हा प्रश्न मार्गी लावून कर्मचाऱ्यांचा हा लढा यशस्वी केला त्याबद्दल महापौरांनी त्यांचेही आभार यावेळी व्यक्त केले. सफाई कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या हक्काची घरे मिळावीत यासाठी गेली अनेक वर्षे सर्वजण पाठपुरावा करीत होते. या नवीन इमारतीच्या कामाचे भूमीपूजन लवकरच करण्यात येणार असल्याचे उपमहापौर पल्लवी कदम यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -