Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे ऑक्सिजनअभावी ठाण्यातील वोल्टास आणि पार्किंग प्लाझा ही दोन रुग्णालये बंद

ऑक्सिजनअभावी ठाण्यातील वोल्टास आणि पार्किंग प्लाझा ही दोन रुग्णालये बंद

कोविड रुग्णालय सुसज्ज असूनही ऑक्सिजन अभावी बंदच ठेवण्यात आले आहेत

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. एकीकडे रुग्णांना हॉस्पीटलमध्ये बेड मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत तर दुसरीकडे ठाणे पालिकेचे वोल्टास आणि पार्किंग प्लाझा हे हजारो बेडचे दोन कोविड रुग्णालय सुसज्ज असूनही ऑक्सिजनअभावी बंदच ठेवण्यात आले आहेत. कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर वोल्टास रुग्णालयाचे काम सुरु होते मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर त्याचे काम थांबले. मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने हे हॉस्पीटल कमी कालावधीत पुन्हा तयार केले. या हॉस्पीटलमध्ये ११०० बेड आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची पाहणी केली होती. पार्किंग प्लाझा या हॉस्पीटलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कोरोना रुग्णावर उपचार सुरु होते. मात्र काही दिवसांपूर्वी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे या हॉस्पीटलमधील २६ कोविड रुग्णांचे स्थलांतर करण्यात आले होते.

 

- Advertisement -

पार्किंग प्लाझा हॉस्पीटलमध्ये फक्त विनाऑक्सिजनचे रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजन पुरवठ्याअभावी  हे रुग्णालय सुरू केले गेले नाही. या दोन रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यास तब्बल दोन हजार रुग्णांनाची या ठिकाणी व्यवस्था होणार आहे. सरकारी हॉस्पीटल मध्ये ही अवस्था असताना आता खाजगी रुग्णालयामध्येही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर ऑक्सिजनचा पुरवठा करा अशी मागणी खासगी कोविड रुग्णालयाच्या व्यवस्थापकाने केली आहे. ऑक्सिजन पुरवठा लवकर सुरू झाला तर रुग्णांना दिलासा मिळेल. ‘सध्या ज्या हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजनची गरज असणारे रुग्ण आहेत.  त्या हॉस्पीटलमध्ये  ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसात लवकरच ही दोन जंब्बो कोविड हॉस्पीटल सुरु करण्यात येतील’, असे ठाणे पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी म्हणाले.

- Advertisement -