Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन " तुझ्या श्रापित वाणीमुळे ही घटना घडली '' नेटकऱ्यांचे करणवर विचित्र आरोप

” तुझ्या श्रापित वाणीमुळे ही घटना घडली ” नेटकऱ्यांचे करणवर विचित्र आरोप

कुंभमेळ्यात साधूंची झालेली गर्दी पाहून त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ज्यानंतर आता त्याला अनेकांच्या टिकेचा धनी व्हावं लागलं आहे.

Related Story

- Advertisement -

अनेकदा कलाकार हे सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांच्या संपर्कात राहत असतात. सोशल मीडियाद्वारे वेगळ्यावेगळ्या मुद्द्यांवर ते आपली मतं मांडत असतात. अनेकदा त्यांचं हे व्यक्त होण त्यांना महागात पडताना दिसतं. अशाच प्रकारची परिस्थिती आता अभिनेता करण वाही याच्यासमोर उभी राहिली आहे. कुंभमेळ्यात साधूंची झालेली गर्दी पाहून त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ज्यानंतर आता त्याला अनेकांच्या टिकेचा धनी व्हावं लागलं आहे. सध्या कुंभमेळ्यासंदर्भातील अनेक वृत्त मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यात शाही स्नान पार पडले होते. या साही स्न्नासाठी अनेक आखाड्यातील साधू संत आले होते. मात्र यादरम्यान कोरोनाच्या नियमांची राख-रांगोळी झालेली पाहायला मिळाली. मोठी गर्दी असल्याने अनेक ठिकाणी कोरोना नियमांचेही उल्लंघन होताना दिसून आले. या गर्दीत ना सामाजिक अंतराचे पालन करत होते, ना कुणी मास्क लावताना दिसत होते. ही गर्दी पाहून अनेक सेलिब्रिटिंनी संताप व्यक्त केला होता. करण वाही यानेबी यावरच भाष्य करणारं त्याचं मत इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून शेअर केले होते. ”नागा साधू बाबांसाठी वर्क फ्रॉम होम, अशी काही संकल्पना नाही का म्हणजे गंगेतून पाणी आणत घरीत त्यातून स्नान करावे… , अशी पोस्ट करत आपल्याला पडलेल्या कुतूहलपूर्ण प्रश्न त्याने मांडला होता. या पोस्टनंतर तेथाील साधुंना कोरोनाची लागण झाली असल्याच्या बातम्या दाखवण्यात आल्या.

 

- Advertisement -


करणच्या ही प्रश्न विचारण्याची पद्धत मात्र अनेकांना खटकली. ज्यानंतर नेटकऱ्यांनी करणवर जोरदार टिकेचा मारा केला आहे. ”प्रत्येकवेळी तुम्ही हिंदुंनाच का दोष देता?…तुझ्या श्रापित वाणीमुळे ही घटना घडली आहे.” असे विचित्र आरोप नेटकऱ्यांनी करवनवर करत त्याला आता अनेक धमक्या दिल्या जात आहे.


हे वाचा- करण जोहरच्या ‘दोस्ताना २’मधून कार्तिकला केलं आऊट, पुढे कधीच काम न करण्याचं घेतलं वचन

- Advertisement -