मुंबई : ठाकरे आणि शिंदे गटामध्ये शिवसेना शाखेवरून ठिकठिकाणी वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंब्र्यातील शाखा ताब्यात घेत शिंदे गटाने त्यावर बुलडोझर चालवला. आता त्या ठिकाणी मोठी वास्तू उभारली जाणार आहे. शिवसेनेच्या शाखेचा पुनर्विकास डोळ्यात खुपतो का? असा सवाल शिंदे गटाने ठाकरे गटाला केला आहे. तर, येत्या शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुंब्र्याला जाणार आहेत.
हेही वाचा – शिवसेनेच्या शाखेचा पुनर्विकास डोळ्यात खुपतो का? शिंदे गटाचा ठाकरे गटाला सवाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे राजन किणे यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 जणांचा जमावाने 2 नोव्हेंबर रोजी मुंब्रा येथील शाखेत घुसून ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखाला बाहेर काढले. तसेच, शाखेवरील बोर्डही काढला आणि शिंदे गटाचा बोर्ड लावला. त्यानंतर शाखेवर बुलडोझर चालवून ती भुईसपाट केली. तिथे शाखेची नवी वास्तू उभी करणार असल्या शिंदे गटाने स्पष्ट केले.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे येत आहेत मु्ंब्र्यातील शिवसैनिकांच्या भेटीला! pic.twitter.com/WeQ1J6t8eq
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 8, 2023
आधीपासून डोळ्यात खुपत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या शाखेचा पुनर्विकास होत असल्याने काही जणांना पोटदुखी सुरू झाली आणि शाखा पाडल्याचा कांगावा त्यांनी सुरू केला. शिवसेनेच्या शाखेचा पुनर्विकास डोळ्यात खुपतो आहे का? की अजूनही आनंद दिघे डोळ्यात खुपतात? तुम्ही कितीही कांगावा करा, पण जिथे ही शाखा होती, त्याच जागेवर पुन्हा एकदा सुसज्ज शिवसेना शाखा उभी राहील, असा दावा शिंदे गटाने केला आहे.
हेही वाचा – खोके सरकार विसरूनच गेले होते… महापालिका बोनसच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा निशाणा
त्याला आता ठाकरे गटाने उत्तर दिले आहे. शिवसेना शाखा हा शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा विचार असून तो तुम्ही बुलडोझरने तोडू शकत नाहीत, असे सांगत शनिवारी उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या भेटीसाठी मुंब्रा येथे येणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर केले आहे.