घरठाणेगोळीबार प्रकरणातील फरार आरोपी विकी ग्नोत्रा पोलिसांच्या जाळ्यात

गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी विकी ग्नोत्रा पोलिसांच्या जाळ्यात

Subscribe

उल्हासनगर। शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष महेश गायकवाड यांच्या वर पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांचे बिजनेस पार्टनर विकी ग्नोत्रा याला ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री ठाण्यातूनच अटक केली. हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारली गावात एका दलित कुटुंबियांची पाच एकर जमिनीच्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या सोबत असणार विकी ग्नोत्रा हा या प्रकरणात सह आरोपी आहे. घटना झाल्यापासून ग्नोत्रा हा फरार होता. ठाणे क्राईम ब्रांच पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. परंतु पोलीस जाण्यापूर्वी तो निसटून जायचा दुसरीकडे ठाणे खंडणी विरोधी पथकाचे पोलीस देखील त्याच्या मागवर होत.े शेवटी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याच्यावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतल.े विकी ग्नोत्रा हा गणपत गायकवाड यांच्या अनेक व्यवसायात भागीदार असून गायकवाड यांचे सरकारी, बिन सरकारी आणि अन्य कामकाज विकी पाहात असे. त्याचे सर्व विभागाच्या अधिकार्‍याशी मधुर संबंध असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणातील दुसरे अन्य आरोपी वैभव गायकवाड आणि नागेश बढेकर हे दोघे सध्या फरार आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची टीम वेगवेगळया ठिकाणी शोध घेत आहेत. दुसरीकडे पोलीस ठाण्याच्या बाहेर गोंधळ घालणार्‍यांची ओळख पटवण्यात येत आहे. ज्यांच्याकडे बंदुकीचे परवाने आहेत त्यांना खरंच अशा परवान्याची गरज आहे का, हे तपासले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -