घरठाणेशुक्रवारी ठाण्यात पाणी पुरवठा बंद

शुक्रवारी ठाण्यात पाणी पुरवठा बंद

Subscribe

स्टेमची जलवाहिनी आणि मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शट डाऊन

स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि ठाणे महापालिकेच्या जल वाहिनीची साकेत पुलावरील दुरुस्ती या कामांमुळे येत्या शुक्रवार 26 मे रोजी सकाळी 9.00 ते शनिवार 27 मे रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत असा 24 तासांसाठी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच गुरुवारी सकाळपासून शुक्रवारी सकाळपर्यंत कोपरी परिसरात ही पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनी पाणी जरा जपून वापरावा. या काळात नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा आणि महापालिकेस सहकार्य करावे अशी विनंती प्रशासनाने केली आहे.
स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल, दुरुस्ती यांची कामे या अवधीत केली जाणार आहेत. तसेच, ठाणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या मुख्य जल वाहिनीची साकेत पूल येथे दुरुस्ती तसेच व्हॉल्व बदलेले जाणार आहेत. या कामांसाठी हा 24 तासांचा शट डाऊन घेण्यात येणार आहे.

या भागात बंद राहणार पाणी पुरवठा
या काळात घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतू पार्क, कारागृह परिसर, गांधी नगर, रुस्तमजी, इंदिरा नगर, रुपादेवी, श्रीनगर, समता नगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा या भागातील पाणी पुरवठा शुक्रवार 26 मे रोजी सकाळी 9.00 ते शनिवार 27 मे रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत बंद राहील. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

- Advertisement -

गुरूवारी कोपरीत पाणी नाही
कोपरी येथील ठाणे महापालिकेच्या धोबीघाट जलकुंभाची 500 मीमी व्यासाची मुख्य जलवितरण वाहिनी विकास कामात बाधित असल्याने स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी क्रॉस कनेक्शन घेण्यात येणार असल्याने गुरूवार, 25 मे सकाळी 9.00 पासून ते शुक्रवार 26 मे रोजी सकाळी 9.00 पर्यंत 24 तासांसाठी कोपरी परिसरातील धोबीघाट व कन्हैयानगर जलकुंभावरुन होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

शुक्रवारी दिवा परिसरातील काही भागाचा पाणीपुरवठा ८ तासांसाठी बंद
ठाणे शहरातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत निळजे येथून दिवा जुन्या प्रभाग क्र. २७ व २८ करीता ५०० मी.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहीनीव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो. सदर जलवाहीनीवर उसरघर रेल्वे कल्व्हर्ट पलावा सिटी कंपाऊन्ड, येथे मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली असल्यामुळे परिसरात वारंवार कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्या अनुषंगाने मुख्य जलवाहीनीला झालेली गळती थांबविणे अत्यावश्यक असून मुख्य जलवाहीनी वरील गळती बंद करण्याकरीता २६ मे २०२३ रोजी सकाळी १०.०० ते सायं ६.०० या वेळेत ८ तासाकरीता दिवा शहरातील प्रभाग क्र. २७ व २८ करीता होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या परिसरातील पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील ०१ ते ०२ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा.
या भागातील होतील तक्रारी कमी
सदर गळतीचे काम पूर्ण झाल्यावर दिवा प्रभाग समिती अंतर्गत आगासन, बैतेवडे, गणेश नगर, बेडेकर नगर, म्हसोबा नगर, शांती नगर, बि.आर. नगर, मुन्द्रा देवी कॉलनी, साबे गाव, व दिवा पश्चिम इ. परिसरसताल पाण्या संबंधित तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. तरी दुरूस्तीच्या कामासाठी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

भिवंडीत शुक्रवार, शनिवारी पाणी नाही
स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कं. प्रा.लि. यांनी पावसाळ्यापूर्वी दैनंदिन देखभाल दुरुस्तीची कामे करून घेण्याकरिता बुधवार दि.24 मे 2023 ते 25 मे 2023 रोजी जाहीर केलेला शटडाऊन कंपनीने रद्द केला असून त्या ऐवजी शुक्रवार दि.26/5/2023 रोजी सकाळी 9 ते शनिवार दि. 27 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत असा 24 तासांचा शटडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे भिवंडीत या दरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पावसाळ्यात पाणी पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून स्टेम कंपनीने हि दुरुस्तीची कामे हाती घेतली असल्याचे स्टेम कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांनी लेखी पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती मनपाच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी दिली. या शटडाऊनचा परिणाम ठाणे महानगरपालिका, मिरा भाईंदर महानगरपालिका आणि भिवंडी महानगरपालिकेच्या क्षेत्रातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -