घरदेश-विदेशLockDown: मद्यपींना दिलासा; उद्यापासून मिळणार घरपोच दारू

LockDown: मद्यपींना दिलासा; उद्यापासून मिळणार घरपोच दारू

Subscribe

१५ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाइन मद्य विक्री सुरू करण्यात येणार आहे.

वाईन शॉपजवळ मद्य खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऑनलाइनच्या माध्यमातून १४ मे पासून घरपोच मद्य विक्री करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला होता. परंतु, डिलिव्हरी बॉय मिळण्यात येणाऱ्या अडचणी तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी व ओळखपत्र तयार करण्यास अवधी मिळावा, यासाठी १४ मे ऐवजी आता १५ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाइन मद्य विक्री सुरू करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने काही उद्योगांसाठी लॉकडाऊन शिथिल केला आहे. त्यामध्ये मद्यविक्री आणि इतर उद्योग व व्यवसायांचा समावेश आहे. परंतु, मद्य खरेदीसाठी वाईन शॉप परिसरात अर्धा ते एक किलोमीटरच्या लागलेल्या रांगा आणि सोशल डिस्टन्स पाळला जात असल्याची दखल राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतली. तसेच संबंधीत महानगरपालिका व जिल्हाधिकारी व परिसरात अनेक ठिकाणी मध्ये विक्रीची दुकाने बंद करण्यात आली होती.

- Advertisement -

यावर उपाय म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने केवळ वैद्यकीय कारणास्तव मद्य सेवन करण्याचा परवाना दिलेल्या व्यक्तींनाच ऑनलाइन मद्य विक्री करता येण्याचा निर्णय घेतला असून ऑनलाइनच्या माध्यमातून ही सेवा घरपोच देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कोरोना विषयक अटींची पूर्तता करण्याचे निर्देश वाईन शॉपच्या मालकांना दिले होते. केवळ दोन दिवसात अटींची पूर्तता करणे शक्य नसल्यामुळे वाईन शॉप मालकांनी केलेल्या विनंतीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने १४ मे ऐवजी आता १५ मेपासून ऑनलाइन मद्य विक्री घरपोच सेवा देण्याचे आदेश बुधवारी दुपारी पारित केलेले आहेत.


तळीरामांची प्रतिक्षा आणखी वाढणार, मद्यविक्रीची होम डिलिव्हरी १ दिवस लांबणीवर!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -