घरट्रेंडिंगVideo : राष्ट्रगीताला उभे न राहिलेले बंगळुरूमधील कुटुंब झाले टीकेचे धनी

Video : राष्ट्रगीताला उभे न राहिलेले बंगळुरूमधील कुटुंब झाले टीकेचे धनी

Subscribe

या घटनेला काही लोकांनी समर्थन केले असेल तरी काहींनी याला तीव्र विरोध केला आहे.

राष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहिल्यामुळे बंगळुरूमधील एका कुटुंबाला चित्रपटगृहातील लोकांच्या रोषाला सामोर जावे लागेल. सध्या सोशल मीडियावर या कुटुंबासोबतचा वादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बंगळुरुच्या एका चित्रपटगृहात हे कुटुंब राष्ट्रगीत सुरू असताना उभे राहिले नाही. त्यामुळे चित्रपटगृहात वाद निर्माण झाला. या वादा दरम्यान कन्नड अभिनेत्री बी. व्ही ऐश्वर्या आणि अरुण गौडा यांनी या कुटुंबाला ‘पाकिस्तानी दहशतवादी’ म्हणून संबोधले.

- Advertisement -

या घटनेचा व्हिडिओ कन्नड अभिनेत्री बी. व्ही ऐश्वर्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला होता. परंतु, तिने त्यानंतर हा व्हिडिओ डिलिट केला. मात्र खूप लोकांनी हा व्हिडिओ फेसबुक शेअर केल्यामुळे तो व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

या व्हिडिओमधील लोक त्या कुटुंबाला असं म्हणतात की, ‘तुम्ही आम्हाला सांगताय की, राष्ट्रगीताला उभे राहणे हा तुमचा निर्णय आहे? तर हा निर्णय तुम्ही घेऊ शकतं नाही.’ त्या कुटुंबातील एक महिला जमावाला उत्तर देताना म्हणाली की, ‘हा एक सिनेमा आहे. तुम्हाला जर काही समस्या असेल तर तुम्ही खटला दाखल करा.’ तेव्हा तिथले लोक म्हणाले, ‘आम्हाला जर हवे असेल तर आम्ही खटला दाखल करू.’

तसंच एक माणूस म्हणाला की, ‘मला असं वाटतं की, तुम्ही भारतीय भूमीवर उभे आहात तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही पाकिस्तानी दहशतवादी आहात का?’ असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना त्या कुटुंबातील महिला म्हणाली की, ‘भारताचे विरुद्ध पाकिस्तानी आहे हे मी ऐकून चकित झाली.’

सोशल मीडियावर या सर्व घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. ही घटना सध्या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर ‘राष्ट्रीय गीत’ म्हणून ट्रेंड होत आहे. या घटनेच्यास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी या कुटुंबाच्या भूमिकेचे समर्थन केले. तर काही लोकांनी राष्ट्रगीताचा आदर केला नाही म्हणून मारहाण करण्याचा प्रयत्न देखील केला.

पहा ट्विवटर युझर काय म्हणाले ते….?

या कुटुंबाला समर्थन केलेले युझर काय म्हणाले? ते पहा….

एक प्रतिक्रिया

  1. कशाला रे बिचाऱ्यांना बोलता? त्यांना कदाचित आपण भारतात आहोत हे माहीत नसेल. मोहन देवळे.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -