घरट्रेंडिंग#आज_भारत_बंद_है Vs #BharatBandhNahiHoga ट्विटरवर सुरू आहे कोल्ड वॉर

#आज_भारत_बंद_है Vs #BharatBandhNahiHoga ट्विटरवर सुरू आहे कोल्ड वॉर

Subscribe

कृषी कायद्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकरी संघटनांनी सकाळी ११ पासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत ‘भारत बंद’ची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या या ‘भारत बंद’ हाकेला मोदी सरकारच्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने विरोधकांवर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला आहे. हे सर्व एकाबाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला म्हणजेच सोशल मीडियावर एक वेगळेच कोल्ड वॉर सुरू आहे. सोशल मीडियावर काही लोक ‘भारत बंद’च्या समर्थनात तर काही विरोधात आहेत.

‘भारत बंद’ समर्थन करणाऱ्या राजकारणी पक्ष, संघटना यांच्याबाजूने #आज_भारत_बंद_है हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. तर ‘भारत बंद’ विरोध करणारे #BharatBandhNahiHoga या हॅशटॅगसोबत आपले मत व्यक्त करत आहेत. प्रत्येक जण आपापल्या विचारानुसार ट्विटवर मत व्यक्त करत आहेत आणि एकमेकांवर निशाणा साधत आहे.

- Advertisement -

#आज_भारत_बंद_है

शेतकऱ्यांच्या या ‘भारत बंद’ला अनेक राजकारणी पक्षांचे समर्थन आहे. आज अनेक पक्ष आपापल्या भागातून या भारत बंदला समर्थन करत असून यासंदर्भातील फोटो ट्विटवर शेअर करत आहेत.

- Advertisement -

 

#BharatBandhNahiHoga

भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेल्या संघटनांचे समर्थक या ‘भारत बंद’ला मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत. या भारत बंद विरोधात वेगवेगळ्या प्रकारे ट्विट करून विरोध दर्शवला जात आहे.

 

यादरम्यान आज सोशल मीडियावर ‘भारत बंद’ संदर्भातील मीम्स तुफान व्हायरल होत आहे. अनेक मंडई सुरू असल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. तसेच या व्यतिरिक्त काही युजर्स ‘भारत बंद’ अयशस्वी झाल्याबद्दल खिल्ली उडवत आहेत.

दिल्लीच्या सीमेवर उभे असलेल्या शेतकर्‍यांनी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्यांना सर्वसामान्यांचे नुकसान करायचे नाही, तर सरकारपर्यंत पोहोचायचे आहे, असे शेतकरी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.


हेही वाचा – भारत बंद; मुंबई,ठाणे सुरूच


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -