घरट्रेंडिंग'New Year 2022' च्या पिकनिकचा प्लॅन रद्द करताय? मग थोडं थांबा, जाणून...

‘New Year 2022’ च्या पिकनिकचा प्लॅन रद्द करताय? मग थोडं थांबा, जाणून घ्या ‘ही’ पाच ठिकाणं जिथं ओमिक्रॉनचं टेन्शन नसणार

Subscribe

हल्ली रोजगारानिमित्त सर्वजण बाहेर जात असतात त्यामुळे या धावपळीच्या जीवनात परिवाराला किंवा मित्रपरिवाराला वेळ देता येत नाही.त्यामुळे नववर्षाच्या मुहूर्तावर अनेकजण वन डे पिकनिकचे नियोजन करत असतात.गेले दोन संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले होते.त्यामुळे लादण्यात आलेले अनेक निर्बंध कमी करण्यात आले असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही.त्यामुळे ३१ डिसेंबर आणि नववर्षाला अवघे काही दिवस बाकी असतानाच कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध लादण्यात आले असून,पिकनिकचे प्लॅन करणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. मात्र तुम्ही अशा जागी पिकनिक करु शकता ज्याठिकाणी तुम्हाला कोरोनाचे अजिबात टेन्शन नाही. तुम्ही तुमच्या इमारतीच्या गच्चीवरसुद्धा घरच्यांसोबत पार्टी करु शकता.

बागेमध्ये पिकनिक करु शकता…

तुम्हाला या पिकनिकच्या बहाण्याने आउटिंगची मजा करायची असेल तर, गावाच्या बागेमध्ये तुम्ही फॅमिली पिकनिकचाही आनंद घेऊ शकता.संपूर्ण हिरव्या घनदाट झाडीमध्ये आणि सोबत पक्ष्यांच्या किलबिलाटसह पिकनिक करण्याचा आनंदच काही और आहे. आता थंडीचा महिना सुरु आहे त्यामुळे तुम्ही तिथे शेकोटीसुद्धा पेटवू शकता.

- Advertisement -

नदी तलावाच्या किनारी पार्टीचा आनंद घेऊ शकता…

पहिलं पार्टी म्हटलं की, घराच्या जवळ नदीवर बांधलेल्या घाटांवर एकत्र येण्याचा ट्रेंड होता.मात्र जशी आधुनिकता जवळ येत आहे तशा आपल्या जीवनशैलीतील अनेक गोष्टी बदलत आहे.मात्र आता कोरोनामुळे पुन्हा हा योग जुळून आला आहे.त्यामुळे तुम्हीही या नदी किंवा तलावावरही पिकनिकचे नियोजन करु शकता.

दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवा…

जर तुम्हाला नवीन वर्ष हे वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा असेल,तर तुम्ही अनाथ आश्रमाला भेट देऊ शकता. त्यामुळे तुम्ही तुमच्या परिवाराला तिथे घेऊन जाऊ शकता. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे यातही एक वेगळे समाधान आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – मध्य प्रदेशपाठोपाठ आता उत्तर प्रदेशमध्येही २५ डिसेंबरपासून Night Curfew, महाराष्ट्राचं काय?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -